विरवडे बु : ऊस शेती करणाऱ्या बाजीराव राठोड यांनी आपल्या ऊसाच्या शेतात राजरोसपणे गांजा पिकवला. कामती पोलिसांनी धाड टाकून हा सर्व गांजा जप्त केला आहे. Farmer grows ganja in Solapur sugarcane field, action of Kamti police
शेतीमालाला भाव नसल्याने शेतक-याने जिल्हाधिका-यांकडे गांजा शेती करण्यासाठी परवानगी मागितली होती. काही वर्षापूर्वी अशी मागणी सोलापुरातही एका शेतक-यांनी केली होती. पण आता विनापरवाना अशाप्रकारे ऊसाच्या शेतात गांजा पिकवण्याच्या प्रकरणातही आता वाढ होऊ लागली आहे. अशीच मागील काळात मोहोळ हद्दीत गांजा पिकवला होता. पोलिसांनी कारवाई केल्याने उजेडात आले होते.
मोहोळ तालुक्यातील दादपूर शिवारात एका शेतकऱ्याने स्वत च्या शेतात उसाच्या फडात गांजाची लागवड केली होती. ही माहिती कामती पोलिसांना कळताच लागवड केलेल्या शेतात कामती पोलिसांनी धाड टाकून 75 गांजाची लहान मोठी झाडे एकूण 90.790 किलो गांजा जप्त केला या गांजाची अंदाजे किंमत 9 लाख 7 हजार 900रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले.
गांजा व शेतकरी बाजीराव लोभा राठोड (वय 56 रा. लमाणतांडा कामती खुर्द ता मोहोळ) असे तब्यात घेतलेल्या शेतक-याचे नाव आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेली माहितीनुसार सोमवारी ( दि 31) गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार दादपूर हद्दीत असणाऱ्या शेतांत मोठ्या प्रमाणता उसाच्या फडात गांजाची लागवड केली आहे ही माहिती मिळाली.
कामती पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरिक्षक अंकुश माने, पोहेकॉ यशवंत कोटमळे, भारत चौधरी, अमोल नाईकवाडे, जीवराज कासविद ,पवार आदी पोलीस आदि कर्मचाऱ्यांनी गट न 51/1/ब या गटात उसाच्या फडात जाऊन शोधा शोध केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
येथील शेतकऱ्यांने ऊसाच्या पिकामध्ये आंतरपिक म्हणून थेट गांजाचीच लागवड केल्याचे आढळून आले. त्यांच्या शेतामध्ये गांजाची ७५ रोपे आढळून आली. गांजाची शेती करणे तसा कायद्याने गुन्हा आहे तरी हि वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी गांजाची लागवड ही करीतच आहेत. शिवाय संशयित आरोपी बाजीराव लोभा राठोड याला ताब्यात घेतले असून कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली , अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करित आहेत
□ सोलापूर : लोकमंगल अन् सिद्धेश्वर बँकेची निवडणूक जाहीर, निवडणूक लागल्यास डिसेंबरमध्ये मतदान
सोलापूर : लोकमंगल सहकारी बँक व सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, दोन्ही संस्थांचा निवडणूक कार्यक्रमा एक सारखे आहे. लोकमंगलसाठी आबासाहेब गावडे हे, तर सिद्धेश्वरसाठी जिल्हा उपनिबंधक हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.
या दोन्ही साखर कारखाना निवडणूक कार्यक्रमानुसार दोन्ही बँकांसाठी दि. ४ डिसेंबर रोजी मतदान नियोजित आहे. एकूण १८ जागांसाठी लोकमंगलची तसेच १५ जागांसाठी सिद्धेश्वरची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे.
□ असा आहे निवडणूक कार्यक्रम
सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान उमेदवार अर्ज विक्री व दाखल करता येणार आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी दि. ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत घेता येणार आहे. त्यानंतर अंतिम पात्र उमेदवारांची यादी दि. २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज जास्त आले आणि कोणी अर्ज मागे न घेतल्या निवडणूक लागणार.
निवडणूक लागल्यास दि. ४ डिसेंबर रोजी दोन्ही बँकांसाठी मतदान होणार आहे. दि. ५ डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित असल्याचे सहकार विभागाने सांगीतले.