मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मला अटक करावी लागेल, असे पोलिसांनी आपल्याला म्हटल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे. यावर त्यांनी ट्वीटवर ट्विट करीत खळबळ माजवून अटकेवरून दबाव दिला असल्याचे दाखवून दिलंय. Ex-minister Jitendra Awad arrested, one tweet after another disabled independent ministry
जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध करताना चित्रपटगृहातील शो बंद पाडला होता. यावेळी मारहाण झाली होती. या प्रकरणी ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता.
यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता त्यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पाठोपाठ एक असे तीन ट्विट केले आहेत, यात त्यांनी लिहिले आहे, “आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.”
हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
पुढील ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.”
यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, “हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो मी गुन्हा कबूल करणार नाही.”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ महाराष्ट्र पहिले राज्य; दिव्यांगांसाठी आता स्वतंत्र मंत्रालय
मुंबई : राज्यात दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. या निर्णयामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ, रोजगार आणि शिक्षणामध्ये त्यांना संधी, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी साईन लँग्वेज विकसित करणे या गोष्टी विकसित केल्या जातील. दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळणे गरजेचे आहे. यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न केले जातील. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावं यासाठी बच्चू कडू अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.
सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरु करण्यासोबतच राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद, नरगपालिका आणि स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग भवनची स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही व्यापक योजना तयार करुन मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी आहे. त्यामुळे आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीएवढीच रक्कम या दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
याबाबत बुधवारी (ता. ९) मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठी स्वाधार योजना, गाडगेबाबा घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मुकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम मिळावं यासाठी प्रयत्न केलेल जाणार आहेत.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यासंदर्भात मान्यता दिल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून निर्णयाचे स्वागत केले.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ, रोजगार आणि शिक्षणामध्ये त्यांना संधी, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी साईन लॅग्वेज विकसित करणं या गोष्टी विकसित केल्या जातील. दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळणं गरजेचं आहे. यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न केले जातील.
दिव्यांगांच्या हक्कांसाठी आम्ही गेली २५ ते २६ वर्षे लढा देतोय, त्याला आता यश आलं आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत हे शासन मंत्रालय स्थापन करणार आहे. दिव्यांग मंत्रालय हा देशपातळीवरील मोठा निर्णय आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आभार मानतो असे ते म्हणाले.२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अपंग व्यक्तींची लोकसंख्या २९,५९,३९२ इतकी आहे. राज्याच्या एकुण लोकसंख्येपेक्षा अपंग व्यक्तींची संख्या २.६३ इतकी टक्के आहे.