● नागरिक, व्यापाऱ्यांचा गोंधळ ; घरे न पाडण्याच्या सूचना
• पंढरपूर : पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात २०० फुटापर्यंत रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव गुरुवारी सामान्य प्रशासनच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम भवन येथे सादर करण्यात आला. A proposal to widen the Vitthal-Rukmini temple area up to 200 feet Pandharpur trade chaos
पंढरपूर विकास आराखड्यांतर्गत वाराणसी व उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिकांसह महाराज मंडळी यांना माहिती देण्यासाठी संत तुकाराम भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.
मंदिराच्या बाजूने मोठे रुंदीकरण होणार असल्याची माहिती देताच उपस्थित नागरिक व्यापाऱ्यांनी मोठा गोंधळ सुरू केला. यावेळी नागरिकांनी आराखड्याविषयी सविस्तर माहितीच नसल्याचा मुद्दा मांडला. तसेच पंढरपूर हे प्राचीन शहर असल्यामुळे येथे वारकरी परंपरा असून सर्वसामान्यांची घरे पाडू नयेत अशी सूचना केली.
यावर सौरभ राव यांनी पुढील चार दिवस शहरातील विविध ठिकाणी सदर आराखडा माहितीस्तव पाहण्यास दिला जाणार असल्याचे जाहीर केले तसेच यावर सूचना कराव्यात असे आवाहन केले.
दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुजाता सैनिक यांनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार घाट असा कॉरिडॉर करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. यासाठी ७२ हजार वर्ग मीटर किंवा ४० हजार वर्ग मीटर अशी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे.
श्री विठ्ठल मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूस साठ मीटर अर्थात २०० फूट भूसंपादनाचा
देखील प्रस्ताव असल्याची माहिती दिली. मात्र प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण केल्यानंतर बाहेरील विकासाचा विचार करण्यात येईल, असेही सौनिक यांनी जाहीर केले.
■ आराखडा नागरिकांसाठी खुला करणार
यावेळी उपस्थित महाराज मंडळी, स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी यास कडाडून विरोध दर्शविला. याची दखल घेऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सदर आराखडा चार दिवस नागरिकांना खुला करण्यात येणार असून यावर हरकती सूचना मांडाव्यात असे आवाहन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 स्मार्ट सोलापूर महापालिकेने जपला गिरणगावच्या भोंग्याचा आवाज
सोलापूर : स्वातंत्र्य पूर्वकाळापासून सोलापूर हे गिरणगाव म्हणून जगप्रसिद्ध होते. नियमितपणे वाजणाऱ्या गिरण्यांच्या भोंग्यावर सारे शहर तेव्हा सतर्क आणि जागे व्हायचे. काळानुसार विविध कारणास्तव गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट होत गेली. गिरणगाव ते स्मार्ट सोलापूर असा आमूलाग्र बदल झाला. मात्र सूत व कापड गिरण्यांच्या त्या भोंग्याचा आवाज स्मार्ट महापालिकेने आजही जपलाय.. हे विशेष महापालिकेच्या या भोंग्याच्या आवाजाचे आ. प्रणिती शिंदे यांनीही कौतूक केले आहे.
सोलापुरातील पहिली गिरणी शेठ गोकुळदास मोरारका यांनी १८७४ मध्ये सुरू केली. तिला आजही आपण जुनी मिल म्हणून ओळखतो. त्यावेळी सोलापूर शहरात पूर्वी लक्ष्मी विष्णु, नरसिंग गिरजी, जाम श्री, सोलापूर सूत मिल, यशवंत, शारदा यासह अनेक छोट्या-मोठ्या सूत गिरण्या होत्या. सोलापूरला गिरणगाव’ अशी नवी ओळख मिळाली.
या गिरण्यांमध्ये हजारो कामगार कार्यरत होते. त्यावेळी गिरणी सुरू झाल्यावर भोंगा सुरू होत होता. सर्व पाळ्यांमध्ये चालणाऱ्या गिरणीमध्ये नियमितपणे वाजणाऱ्या भोंग्यावर सारे शहर तेव्हा सतर्क आणि जागे व्हायचे. मात्र कालांतराने मात्र आधुनिकीकरण, जागतिकीकरण आले आणि औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विविध कारणास्तव गिरण्यांनी मान टाकली. गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट झाली आणि भोंग्याचा आवाजही बंद झाला.
दरम्यान, गिरणगावातील बंद कापड गिरण्यांच्या भोंग्याचा आवाज मात्र स्मार्ट सोलापूर पालिकेने जपला आहे.
पूर्वी कापड गिरण्यांच्या शिफ्ट वाईझ भोंग्याच्या आवाजावर कामगार सतर्क रहायचे आणि आता शहराचा कारभार पाहणाऱ्या स्मार्ट पालिकेचे कामकाज भोंग्यावर चालत आहे. सकाळी पावणे दहा वाजता सोलापूर पालिकेचा भोंगा वाजतो.. जेवण सुट्टीसाठी दुपारी दीड वाजता.. पुन्हा २ वाजता आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता शेवटचा भोंगा वाजतो. त्यावरच पालिका कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. गिरण्यांच्या त्या भोंग्याचा आवाज महापालिकेने आजही जपला आहे. याबाबत निवृत्त कामगारांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
□ गिरण गावची आठवण झाली : आमदार शिंदे
मध्यंतरी १९९५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे आदेश वाटप करण्यासाठी आ. प्रणिती शिंदे सायंकाळी महापालिकेत आल्या होत्या. त्यावेळी सायंकाळच्या सुमारास कार्यक्रमादरम्यान महापालिकेचा भोंगा वाजला. त्यावेळी आ. शिंदे यांनी आपले भाषण थांबवून हा कशाचा आवाज आहे, असे विचारल्यावर कामगारांनी हा भोंग्याचा आवाज आहे असे सांगितले.
त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांना गिरण्याच्या भोंग्याचा आवाज आठवला. त्यांनी जुन्या काळी गिरण्यातील भोंग्याचाही असाच आवाज होता. त्यामुळे पुन्हा एकदा गिरणगावची आठवण झाल्याचे सांगत महापालिकेचे कौतूक केले.