● वैद्यनाथ वाघमारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा – सुषमा अंधारे
● अंधारे तोफ वगैरे काही नाही, त्यांना घडवणारा मीच – वैद्यनाथ वाघमारे
मुंबई : ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून एक नवा डाव टाकण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैद्यनाथ वाघमारे यांना शिंदे गटात घेऊन ठाकरे गटाला उत्तर देण्याचा डाव असल्याचे दिसत आहे. Sushma Andharen’s estranged husband Shinde in the group; Vaidyanath Waghmare left his wife Shiv Sena political
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील आणि ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी धक्का दिला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे सरकार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती हे शिंदे गटात गेले आहेत. ‘त्यांना निर्णय घेण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. ते शिंदे गटात जाणार असतील तर वैद्यनाथ वाघमारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा,’ असे त्या म्हणाल्या. ‘माझं आयुष्य ओपन बुक आहे. माझी मुलगी कबीरा सुषमा अंधारे असे नाव लावते. यातून सर्व उत्तरे मिळतात, या निर्णयाने माझ्या आयुष्यावर काहीही फरक पडणार नाही, असे त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचं कारण नाही.” भावना गवळी शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असं मत सुषमा अंधारे यांनी मांडलं. पुढे त्या म्हणतात, त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं? कुठे जाऊ नये? हा त्यांचा प्रश्न आहे. तो विषय चर्चेचा होण्याचं कारण नाही. भविष्यात काय चित्रं असेल हे सांगता येत नाही. पण त्यावेळी कर्तव्य हे श्रेष्ठ असेल. मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक गोष्टी सहन करण्याची माझी तयारी आहे. मी मेंटली तयार आहे. येणारा प्रत्येक वार झेलायला मी तयार आहे, असं त्या म्हणाल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैद्यनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. ही विचाराची लढाई आहे. मला एकनाथ भाईंचे विचार आवडले. शिंदे यांचा विद्रोही. क्रांतिकारक स्वभाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अंधारे तोफ वगैरे काही नाहीत. त्यांना घडवणारा, वैचारिक परिपक्व करणारा मीच आहे, असेही ते म्हणाले.
वैजनाथ वाघमारे वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले.”
“सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. मला त्यांना नेताच करायचं होतं. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं. पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नाही. तो त्यांचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही,” अशी माहिती वैजनाथ वाघमारे यांनी दिली.
□ दीपाली सय्यद यांनी आधी मागावी माफी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होते. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिले. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत.
त्या नाराज असल्याने शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असतानाच, त्या आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा प्रवेश झालाच नाही. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला आहे.
त्यांनी आधी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या ठाणे शहराध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी केली आहे. भाजपच्या विरोधामुळेच तर ऐनवेळेस दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश तर रद्द झाला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.