Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरात सुताच्या कारखान्यांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

Fierce fire at yarn factories in Solapur; MIDC police station lost lakhs

Surajya Digital by Surajya Digital
November 13, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापुरात सुताच्या कारखान्यांना भीषण आग; लाखोंचे नुकसान
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● नीलम नगरातील घटना, आगीचे कारण अस्पष्ट

सोलापूर : शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलम नगर येथील दोन सुत कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखान्याला शनिवारी (ता. 12) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे रुद्र रूप पाहून अनेक नागरिक नीलम नगर परिसरातील एमआयडीसीकडे धाव घेत होते. सोलापूर शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी देखील दाखल झाले. Fierce fire at yarn factories in Solapur; MIDC police station lost lakhs

या आगीत दोन कारखाने जळून खाक झाले. परंतु इतर टॉवेल कारखान्यांना थोडीशी झळ बसली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.  नीलम नगरातील लोकमंगल हॉस्पिटलसमोरील दोन सूत कोम कारखान्यांना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. शेजारी सूत कोमाचे काही कारखाने असल्याने आग त्यादिशेने गेली.

दोन – तीन कारखान्यांना आग लागली. पण, अग्निशामक दलाच्या जवानांच्या परिश्रमामुळे आग आटोक्यात आली. नीलम नगर येथे वसंत नेमचंद मुनोत एक्स्पोर्ट टॉवेल कारखान्याला सायंकाळी अचानक आग लागली. तेथून धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. तेथून ये-जा करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. आजूबाजूलाही गारमेंट व टॉवेल कारखाने होते. मुनोत यांच्या कारखान्यात सुताचे कोम होते. शेजारील कारखान्याकडे आगीच्या ज्वाळा पसरत होत्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

शहरातील रविवार पेठ सावरकर मैदान, होटगी रोड, या ठिकाणी असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी तात्काळ पोहोचल्या. त्यामुळे इतर कारखाने याआगीतून वाचू शकले.अग्निशामक दलाची वाहने त्या ठिकाणी पोहोचत असताना रस्त्यावरील वाढती रहदारी,अरुंद रस्ते यामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले होते.

या आगीमध्ये कोणतीही जीवित आणि झाली नसल्याची माहिती असून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली. आगीची घटना कळतात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने तसेच पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली.तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवले.

 

● आगीचे कारण मात्र अस्पष्ट

 

केदार आवटे हे १५ – २० कर्मचाऱ्यांना घेऊन आग विझवू लागले. त्यांनी आजूबाजूला पाणी मारायला सुरवात केली, जेणेकरून आग इतर कारखान्यांना लागू नये. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत आग विझविण्याची कार्यवाही सुरू होती. १५ ते २० गाड्या पाणी मारून आग विझवली. आगीत जीवितहानी झाली नाही, पण वित्तहानी मोठी झाली. आगीचे कारण अस्पष्टच राहिले.

● आगीत दोन कारखाने भस्मसात

 

आत्तापर्यंत १५ ते २० पाण्याच्या गाड्यांचा फवारा केला आहे. या आगीत दोन कारखाने भस्मसात झाले असून, इतर बाजूच्या कारखान्यांना झळ बसली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचा सर्व स्टाफ घटनास्थळी दाखल झाली. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी नसून,आगीत लाखोंचे नुकसान मात्र झाले असल्याचे सुराज्यशी बोलताना सांगितले.

– राजन माने, पोलीस निरीक्षक
एमआयडीसी पोलीस ठाणे

Tags: #Fierce #fire #yarn #factories #Solapur #MIDC #police #station #lost #lakhs#सोलापूर #सुताच्या #कारखाना #भीषण #आग #लाखोंचे #नुकसान #एमआयडीसी #पोलीस #ठाणे
Previous Post

भीमा साखर कारखाना : निवडणुकीचा प्रचार पोहचला नको त्या पातळीवर

Next Post

सुषमा अंधारेंच्या विभक्त पती शिंदे गटात; वैद्यनाथ वाघमारेंनी पत्नीला डिवचले

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सुषमा अंधारेंच्या विभक्त पती शिंदे गटात; वैद्यनाथ वाघमारेंनी पत्नीला डिवचले

सुषमा अंधारेंच्या विभक्त पती शिंदे गटात; वैद्यनाथ वाघमारेंनी पत्नीला डिवचले

वार्ता संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697