□ अरबी समुद्रात ३६ किमी अंतर न थांबता पोहणार
सोलापूर – येथील हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती नंदकिशोर भराडिया ही उद्या गुरुवारी (ता. २४) मुंबईतील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे समुद्रातील ३६ किलोमीटरचे अंतर न थांबता पोहून पार करत विश्वविक्रम करणार असल्याची माहिती स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस झुबिन अमारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. Kirti Bharadia of Solapur will set the world record Arabian Sea Worli Sea Link in Mumbai tomorrow
उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून कीर्ती ही पोहण्यास सुरुवात करणार असून, रात्री साधारण आठ वाजेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया येथे ती पोहोचणार आहे. यासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मार्कंडेय जलतरण तलाव येथे दररोज सहा ते सात तास ती सराव करीत आहे. विशेष म्हणजे मागील एक महिन्यापासून मुंबई येथील समुद्रातसुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या विक्रमाचे परीक्षण करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी तिला सोलापुरातील प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या विक्रमासाठी स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर या संस्था तिला सहकार्य करीत असल्याचेही ते म्हणाले. तिने हा विक्रम केल्यास सोलापूरची शान वाढणार आहे.
या पत्रकार परिषदेस सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, मानद सचिव पार्वतय्या श्रीराम, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष कालिदास जाजू, जलतरणपटू कीर्ती भराडिया, तिचे वडील नंदकिशोर भराडिया, प्रशिक्षक श्रीकांत शेटे तसेच श्यामसुंदर भराडिया, जयेश पटेल, प्रताप सूर्यवंशी यांची उपस्थित होते.
□□□□□□□□□□□□□□□□□□□
● वीजग्राहकांनो खोट्या मेसेजपासून सावधान
वीजग्राहकांची बनावट मेसेजद्वारे फसवणूक होत आहे. ‘मागील महिन्याचे वीजबिल न भरल्याने आज रात्री 9:30 वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे सोबत दिलेल्या लिंकद्वारे पैसे भरा किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा’, असा बनावट मेसेज ग्राहकांना येत आहे. महावितरणने www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरुनच बिल भरावे, असे आवाहन ग्राहकांना केले आहे.