□ राजस्थानातील गावाचा भरला पापाचा घडा
पुणे : साऱ्या महाराष्ट्रात सांस्कृतिक शहर म्हणून खास ओळख असलेल्या पुणे शहराला सेक्सस्टार्शनचा (छळ, मानसिक त्रास, ब्लॅकमेल) जबरदस्त विळखा पडला आहे. याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. Pune, which is a cultural city, is a place of ‘sextortion’ in Rajasthan
सेक्सस्टार्शनच्या त्रासाला कंटाळून दोन तरूणांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. राजस्थानमधील एक गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले. तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली. खाक्या दाखवताच त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे.
पुण्यात दोन युवकांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणामुळे पुण्यातील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनच्या रॅकेटचा शोध घेण्यास सुरुवात केली. या तपासात गुरुकोठडी हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील संपूर्ण गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. पहिल्यांदा ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणींचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली.
त्यानंतर दोन तरुणांकडे न्यूड व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून पुण्यात एकाच आठवड्यात सेक्सटॉर्शनचे दोन बळी गेले. काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील एका डॉक्टरला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून लाखोंची खंडणी उकळली गेली. चंद्रपुरातही असे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. या टोळीतल्या तरुणींना अश्लील बोलायला तयार केलेले असते. वेगवेगळ्या नंबरवरून हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात. ज्याला जाळ्यात ओढायचे. त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केले जाते आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते, असा धंदा सेक्सस्टॉर्शनमधून केला जातो.
● अख्खे गावच रॅकेट चालवते
झारखंडमधील जमातारा प्रमाणेच राजस्थानमधील गुरुगोठडी गाव फसवणूक आणि सेक्सटॉर्शनचा अड्डा बनल्याचे उघड झाले आहे. या गावातील सगळे गावकरी सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स तयार करुन त्या माध्यमातून सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याचे पुणे पोलिसांचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन युवकांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली. या गावातील अन्वर खानने मुलीच्या नावे बनावट अकाउंट तयार करुन पुण्यातील १९ वर्षांच्या मुलाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढले. काही दिवस विश्वास संपादित केल्यावर त्याला त्याचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे सुरु झाले. अखेर या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली.
पुण्यातील धनकवडी भागातील तरुणही असाच सेक्सटॉर्शनचा बळी ठरला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या सेक्सटॉर्शनचे मूळ शोधायचे ठरवले आणि सेक्सटॉर्शनचा अड्डा असलेले गाव शोधून काढले. हे संपूर्ण गुरुकोठडी गावच सेक्सटॉर्शनच्या धंद्यात असल्याचे आणि गावातील स्त्री-पुरुष असे मिळून एकूण अडीच हजार लोक यात सहभागी असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
अन्वर खानला पुण्यात आणून पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून आणखी नवीन माहिती समोर येणार आहे. पण सेक्सटॉर्शनचे हे प्रकार रोखण्यासाठी आंतरराज्यीय स्तरावर तपास यंत्रणांनी काम करण्याची गरज यातून अधोरेखित झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● जागतिक राजधानी…
देशात रोज सेक्स्टॉर्शनच्या ५०० हून अधिक घटना घडतात. त्यातून जेमतेम अर्धा टक्का घटनांमध्ये तक्रारी दाखल होतात. भारत सेक्स्टॉर्शनची जागतिक राजधानीच झाला आहे, अशी माहिती असून यात सर्वसामान्यांसह आमदार आणि खासदारांनाही अडकवले जात आहे. सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यानंतर समोरुन पाहिजे तेवढी रक्कम कितीही वेळा मागितली जाते.. त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण असल्याचे सांगण्यात येते.
□ जिवाची पर्वा न करता पाठलाग केला…
पुण्यात एकाच महिन्यात सेक्सटॉर्शनने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे सेक्सटॉर्शन नेमके काय असते आणि ते कसे केले जाते आणि हा प्रकार नेमका कोण करत आहे ? याचा शोध पुणे पोलिसांनी सुरु केला. मोबाईल नंबर लोकेशन शोधले. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ तालुक्यातील गुरु कोठडी असे या गावाचे नाव आहे.
या गावात पोहचल्यावर पुण्यातील मुलाच्या आत्महत्येस कारण ठरलेला आरोपी अन्वर खान याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या गावातील पोलिसांनी आणि त्याच्या घरच्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपीचा अडीच किलोमीटर पाठलाग केला आणि आरोपीला पकडले. राजस्थानमध्ये अनेक तरुण सेक्सटॉर्शनमार्फत पैशाची मागणी करतात. त्यांनी त्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देखील घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.
□ थरकाप सुटणारा एक प्रसंग
पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर याची एका तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. याचा गैरफायदा घेत त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली.
या सततच्या त्रासाला कंटाळून वाडकर या तरुणाने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. तिच्या मागणीनुसार त्याने ४ हजार ५०० रुपये ऑनलाईन दिले. सतत पैसे मागू लागल्याने त्या त्रासाला कंटाळून शंतनूने २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली.
□ जबरदस्त रॅकेट
तुम्ही केलेले पहिले पेमेंट ही फक्त सुरुवात असते. तुम्ही एकदा पैसे दिले की- वारंवार खंडणीची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. व्हॉईस मॉड्युलेशनचा वापर करुनही खंडणी मागितली जाते. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून चालणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण हे रॅकेट एवढे मोठे आहे, की अजूनही खंडणी उकळणे सुरूच आहे. यातून बाहेर कसे पडायचे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
यावर पोलिसांनीही काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पहिले पेमेंट करण्यापूर्वीच पोलिसांची मदत घ्या. खऱ्या महिलेचा फक्त फोटो टार्गेटला दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा, तर महिलेचा रिअर कॅमेरा चालू असतो. महिला स्वतः नग्न होत नसते, तर रिअर कॅमेरा चालू आहे हे दाखवून पॉर्न व्हिडिओ चालवले जातात. पण यात टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू ठेवून त्यात समोरच्याला अडकवले जाते.