सोलापूर : शहरातील हिजामा थेरपी स्पेशालिस्ट असलेल्या तीस वर्षीय डॉक्टराने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यांनी आत्महत्या का केली ही माहिती समोर येऊ शकली नाही. Solapur. The doctor committed suicide by keeping an emotional state
पण आपल्या व्हॉटस्ॲपवर त्यांनी एक दिन बैठे बैठे, मुझे अपनी दुनिया बुरी लग गई। जिसको आबाद करते हुए, मेरे मां बाप की जिंदगी लग गई। ही अतिशय भावनिक असे स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे.
डॉ. असदुल्लाह शहानवाज मुन्शी (वय-३१, कर्णिक नगर २ सोलापूर) असे त्या आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 2) मध्यरात्री बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना तात्काळ मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले.
शनिवारी (ता. 3) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू कशामुळे ‘झाला हे शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक राजन माने व त्यांची पथक त्या ठिकाणी पोचले होते. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांना पत्नी व ३ महिन्यांची मुलगी आहे हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुन्शी यांची ओळख होती.
● असा स्टेटस ठेऊन संपवली जीवनयात्रा
एक दिन बैठे बैठे,
मुझे अपनी दुनिया बुरी लग गई। जिसको आबाद करते हुए, मेरे मां बाप की जिंदगी लग गई ।।
सब सवालात अज़बर थे,
जो इश्क के बाब में, मुझसे पूछे गए। पर सफारिश पे,
इस महकमे में किसी और की नौकरी लग गई ।
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर – पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा द्यावा या कारणावरून घेरडी येथील सरपंचास लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. ही घटना सांगोला येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या संदर्भात यशवंत दगडू पुकळे (वय ४२ रा.घेरडी ता.सांगोला) या सरपंचांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी बिरा पुकळे,अनिल मोठे, दिलीप मोठे, दगडू पुकळे आणि सखुबाई पुकळे (सर्व रा.घेरडी) अशा ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घेरडी येथील सरपंच यशवंत पुकळे हे शुक्रवारी दुपारी राजेंद्र मोठे यांच्यासोबत सांगोला येथील तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा दे, नाही तर तुला सोडत नाही. असे म्हणत त्यांना लाथाबुक्याने मारहाण केला. भांडण सोडवण्यासाठी राजेंद्र मोठे मध्ये पडले असता सखुबाई पुकळे या महिलेने त्यांना चप्पलने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. फौजदार ननवरे पुढील तपास करीत आहेत.