● न्यायालयाकडून चौकशीचे आदेश
बार्शी : बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरीच्या इंडियन शुगर्स साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढून ती रक्कम मागील वर्षीच्या ऊस बिलातून परस्पर बँकेत भरल्याने शेतकऱ्याची फसवणूक केल्याने बार्शी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणी न्या. एन. एस. सबनीस यांनी कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यासह सात जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे चौकशीचे आदेश दिले आहेत. Solapur. Fraud of farmers: Case filed against seven persons including sons of MLA Shinde
यात कारखान्याचे चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक कैलास मते, विजयकुमार धनवे, औदुंबर कदम, सुहास बुरगुटे अन्य दोघे अशा सात जणांचा समावेश आहे. याबाबत बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील शेतकरी मिलिंद नामदेव काळे यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली असून ही घटना २०१४ ते २०२१ दरम्यान घडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यातील फिर्यादी हा इंडियन शुगरच्या तुर्क पिंपरी कारखान्याचा २०१४ पासून सभासद आहे. नियमित ऊस गाळपास या साखर कारखान्यात घालत आलेले असून कारखान्यानेही २०२० – २०२१ पर्यंत नियमित उसाचे बिल दिले आहे. सुहास बुरगुटे यास २०१४ मध्ये ठिबक सिंचन कर्ज प्रकरणास कधीही फिर्यादी जामीन झालेले नसतानाहीं कारखान्याचे चेअरमन रणजीत शिंदे व जनरल मॅनेजर कैलास मते यांनी कारखान्याच्या वतीने आरबीएल बँक शाखा अकलूज मार्फत ठिबक सिंचन संच कर्ज प्रकरण शेतकऱ्यांना देत होते. त्याप्रमाणे २०१४- २०१५ वर्षामध्ये कारखान्याचे चेअरमन रणजित शिंदे, जनरल मॅनेजर कैलास मते, कारखान्याचे तत्कालीन बीट प्रमुख विजयकुमार धनवे, कारखान्याचे तत्कालीन ग्री ऑफिसर औदुंबर कदम, आरबीएल बँकेच्या अकलूज शाखेचे तत्कालीन सेटलमेंट ऑफिसर व तत्कालीन मॅनेजर यांनी सुहास अशोक बुरगुटे यांच्याशी संगनमत करून सुहास बुरगुटे नावाने ८० हजार रुपयांचे ठिबक सिंचन संच कर्ज मंजूर करून घेत कर्जाची रक्कम परस्पर उचलली.
२०१४ पासून २०२२ पर्यंत काळे या शेतकऱ्यास नियमित दरवर्षी कारखान्याने चार ते पाच वेळा कामानिमित्त जाऊनही उस बिलाची रक्कम २०२१ पर्यंत दिली आहे. पण २०२१ – २०२२ मधील उसबिलाची रक्कम ३ लाख १३ हजार ५५४ रुपये काळे यांना दिली नाही. काळे यांच्या १५६ टन ७७७ किलो उस या कारखान्यास गाळपासाठी घालूनही ती रक्कम कारखान्याने दिली नाही.
यासाठी कारखाना प्रशासनास फिर्यादी शेतकऱ्यांनी भेटून मागणी करूनही रक्कम देण्यास स्पष्ट नकार देऊन या उसाची रक्कम सुहास बुरगुटे यांच्या ८० हजार रुपये ठिबक सिंचन कर्ज थकीत पोटी जमा करून घेतल्याचे सांगण्यात आले. यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच, त्यांनी न्यायालयात धाव घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिलिंद काळेंनी वैराग पोलिस स्टेशन, सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार देऊनही दखल घेतली नसल्यामुळे अखेर त्यांनी बार्शीच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी शेतकरी काळे यांच्यावतीने ड. आर. यु. वैद्य, ड. के. पी. राऊत, ड. एस. पी. शहा काम पहात आहेत.