Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बड्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक वसुली मोहीम; पहिल्याच दिवशी तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील

Municipal Corporation's strike recovery campaign on heavy arrears; On the first day

Surajya Digital by Surajya Digital
December 9, 2022
in Uncategorized
0
बड्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक वसुली मोहीम; पहिल्याच दिवशी तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

☆सिंहगड, इंदिरा अभियांत्रिकी कॉलेजवर कारवाई

☆ एका दिवसात सुमारे दोन कोटी रुपयांची

 

सोलापूर : सोलापूर महापालिका कर संकलन विभागाच्या माध्यमातून पाच पथकाने बेधडक कारवाई करत शहरातील मिळकतकराचे बडे थकबाकीदार असलेल्या तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील करण्यात आली आहेत तर गुरुवारी (ता. 8) एकाच दिवशी नोटिसा दिलेल्या थकबाकीदारांकडून एक कोटी २१ लाख रुपये तर इतर थकबाकीदारांकडून ६७ लाख अशी सुमारे दोन कोटीची वसुली करण्यात आली आहे. Municipal Corporation’s strike recovery campaign on heavy arrears; On the first day, the offices of three educational institutions were sealed in Solapur

 

सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार बड्या थकबाकीदारांवर महापालिकेच्या  वतीने जप्तीची व सील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान यापूर्वी सप्टेंबर मध्ये नोटिसा देऊनही तीन लाखावरील मिळकत कर थकबाकीदारांनी थकबाकी भरण्यास प्रतिसाद दिला नाही, थकबाकीदारांविरुध्द गुरुवारपासून जप्ती व सील करण्याची कारवाई सुरू आहे.

बड्या थकबाकीदारांवर सील कारवाई करण्यासाठी एकूण पाच पथके तैनात करण्यात आले आहेत. या पथकाने गुरुवारी बारा ठिकाणाहून ही वसुली केली आहे. या पाच पथकांमध्ये २५ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्यासह पाच पथकाने ही कारवाईची मोहीम राबविली.

 

□ या शिक्षण संस्थांवर सील कारवाई

 

पहिल्याच दिवशी वसुली महापालिकेच्या वसुली पथकाकडून सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ, सिंहगड कॉलेज, केगाव, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळ, एस. एस नवले, बाळे आणि भारतरत्न इंदिरा कॉलेज या शिक्षण संस्थांची कार्यालय, संगणक कक्ष सील करण्यात आली आहेत अशी माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

 

□ या मिळकतदारांकडून सव्वा कोटींची वसुली

थकबाकी असलेल्या नोटीस बजावण्यात आलेल्या मिळकतदारांकडून सुमारे सव्वा कोटी रुपये कर वसुली पथकाने केली आहे. यामध्ये सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्ट, मुरारजी पेठ- ४५ लाख रुपये, मोगलय्या स्वामी/ जवळेकर, ओम डेव्हलपर्स – ११ लाख ३७ हजार ८०२ रुपये, यशोधरा हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ – २० लाख २८ हजार ७०४ रुपये, भद्रावती यंत्रमाग संस्था, एमआयडीसी ३ लाख ८९ हजार ७१६ रुपये, सत्यविजय – मंगल कार्यालय, एमआयडीसी ९ लाख ३५ हजार २५७ रुपये, बी. एस. कामुनी, पाच्छा पेठ ४ लाख ५३ – – हजार ३५३ रुपये, आर. डी. सारडा पाच्छा पेठ, ४ लाख ४३ हजार ५६७ रुपये, डी.एस. जाधव, पाच्छा पेठ – २ लाख २९ हजार ८९१ रुपये, पुलगम टेक्सटाईल १ लाख १२ हजार ५०४ रुपये, मोगलय्या स्वामी, – सोरेगाव – ११ लाख ८९ हजार १२ रुपये, महाराष्ट्र स्व मिल ३ लाख १३ हजार ७०६ रुपये, कृष्णा स्टोन ४ लाख २ हजार ३५१ रुपये असे एकूण १ कोटी २१ लाख ३५ हजार ८६३ रुपये वसुली करण्यात आले आहे. तर आज इतर मिळकत करापोटी एकूण ६७ लाख रुपये वसुली जमा झाले आहे.

 

□ अन्यथा थकबाकी असलेल्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई : पोळ

येत्या १५ डिसेंबरपर्यंत शासकीय मध्ये ८० टक्के सवलतीची अभावी योजना लागू आहे. त्यानंतर मात्र थकबाकीदारांनी व नोटीस बजावलेल्या बड्या थकबाकीदारावर जप्ती वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर थकबाकीदार असलेल्या या शिक्षण संस्थांच्या अंतर्गत शाळा व कॉलेज ही सील करण्याची कारवाई नाईलाजास्तव हाती घ्यावी लागेल.

कोविडच्या काळात ही काही शिक्षण संस्थांनी विद्यार्थी व पालकांकडून फीच वसुली केली होती. नियमितपणे शिक्षण संस्था फी घेतात तर दुसरीकडे महापालिकेचा मिळकत कर भरला जात नाही. शिक्षण संस्थांनी कर हा भरला पाहिजे कोणताही त्रास देण्याचा महापालिका प्रशासनाचा उद्देश नाही, असे उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले.

 

 

 

Tags: #Municipal #Corporation's #strike #recovery #campaign #heavyarrears #firstday #offices #three #educational #institutions #sealed #Solapur#बड्या #थकबाकीदार #सोलापूर #महापालिका #धडक #वसुलीमोहीम #पहिल्याचदिवशी #तीन #शिक्षणसंस्था #कार्यालय #सील
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोमवारी अठरावा दीक्षांत समारंभ

Next Post

सोलापूर । दुचाकीला क्रूझरची धडक; कॉलेजयीन युवकाचा जागीच मृत्यू, घोडा तांडा येथील घटना

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । दुचाकीला क्रूझरची धडक; कॉलेजयीन युवकाचा जागीच मृत्यू, घोडा तांडा येथील घटना

सोलापूर । दुचाकीला क्रूझरची धडक; कॉलेजयीन युवकाचा जागीच मृत्यू, घोडा तांडा येथील घटना

वार्ता संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697