● नरेंद्र मोदींना भाजप नेत्याने म्हटले रावण
पंढरपूर : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना रावण म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रावणासारखे धार्मिक असल्याचे दाखवत उत्तराखंड व वाराणसी येथील मंदिरं पाडली. आता फडणवीस यांच्यासोबत ते पंढरपूरमधील धार्मिक स्थळ पाडण्याचे नियोजन करत आहेत. हा नरसंहार रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे’, असे ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. BJP’s Dr. against the Pandharpur corridor. Subramaniam Swamy came down to the field, Ravana said to Narendra Modi
राज्य सरकारकडून पंढरीत साकारल्या जाणाऱ्या माउली कॉरिडॉर विरोधातील लढ्यात आता माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी उतरले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरात अनेक पुरातन मंदिरे, वारकरी संप्रदायाच्या प्राचीन श्रध्दा असणारे वाडे आणि इतर वास्तू आहेत. त्या उद्ध्वस्त करून कॉरिडॉर बनवण्यात येणार असल्याने याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा सुब्रमण्यम स्वामींनी दिला आहे.
रविवारी सकाळी वारकरी संप्रदायाचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिकांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. स्वामी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रथम राज्य सरकारशी बोलू, न ऐकल्यास थेट न्यायालयातून रद्द करु, असे स्पष्ट करून डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, ज्या पध्दतीने काशीत देखील पुरातन मंदिरे पडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत कॉरिडॉर केला, त्यावरून त्यांची मानसिकता काय असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माउली कॉरिडॉरला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.
हा कॉरिडॉर कोणालाच नको असल्याच्या भावना नागरिकांनी डॉ. स्वामी यांच्यासमोर व्यक्त केल्या. विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा माउली कॉरिडॉर हा खरा वादाचा मुद्दा असून मंदिर परिसरातील रस्ते थेट २०० फुटापर्यंत वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. सध्या मंदिर परिसरात केवळ ६० फुटांचे रस्ते असून अजून जवळपास १४० फूट रुंदी वाढल्याने केवळ या कॉरिडॉरमुळे जवळपास एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कंबर कसली आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर है सरकारमुक्त करण्यासाठी स्वामी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यासाठी लवकरच ते पंढरपूरला येणार असल्याची माहिती आहे.
● स्वामी पंढरपुरात येणार
यापूर्वी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या कॉरिडॉर विरोधात ट्विट करताना रावणासारखे मोदी स्वतःला धार्मिक असल्याचा दावा करत वाराणशी, उत्तराखंडमध्ये मंदिरे पाडत आहेत. आता पंढरपूरच्या पवित्र स्थळांची नासधूस करण्याची फडणवीस यांच्यासोबत योजना आखात आहेत. त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याच्या तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
एकंदर माउली कॉरिडॉरला सर्वच पक्षांचा विरोध आहे. आता याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी पुढे आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारला यावर विचार करावा लागणार आहे. लवकरच सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर येथे येऊन विठुरायाची पूजा करणार असून कॉरिडॉर प्रकरणाची सर्व माहिती घेणार आहेत, असे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 …. त्यामुळे पंढरपुरात कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉर होणार, पंढरीचे वातावरण ढवळले
● अफवा नको; पंतप्रधानासह उपमुख्यमंत्र्यांचा पंढरपूर कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब
सोलापूर : पंढरपूरमधील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा काशी व उज्जैनप्रमाणे सरकारला विकास करायचा आहे. त्यासाठी काही भाग हटवण्यासाठी कॉरिडॉर राबवावा लागणार आहे. यासाठी स्थानिकस्तरावर विरोध होत आहे. पण रविवारच्या पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दयावरून कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात होणारा कॉरिडॉर हा कोणाला उद्ध्वस्त करणार नाही. कोणाचेही घरे तोडणार नाही. मंदिर परिसरातील मठ, मंदिर, परंपरा कायम ठेवणार आहोत. कोणीही कॉरिडॉरबाबत चुकीच्या अफवा पसरवू नये, यातून कोणाचेही नुकसान होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापुरातील गुरव समाजाच्या मेळाव्यात स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरमध्ये भाषण करताना केदारनाथ, काशी व उज्जैनप्रमाणे पंढरपूरचा विकास होणार, असे जाहीर केल्याने आता नागरिकांचा विरोध असणाऱ्या पंढरीतील माउली कॉरिडॉर राबविलाच जाणार, अशीच चर्चा शहरात झाली. तर दुसरीकडे सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना उद्ध्वस्त करून आम्ही काहीही करणार नाही, असे सांगत दिलासा दिला. मात्र, या दोन भाषणांवरच पंढरीचे वातावरण आज ढवळून निघाले होते.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध होत असतानाच रविवारी नागपूर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कॉरिडॉरबाबत आता अंतिम निर्णय झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडॉर होणार हे उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सिद्ध झाले.
पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात ३०० कोटींचा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यातून रस्ते, मठ, पंढरपूर शहरातील गल्ल्या, घाट, लहान-मोठी मंदिरे, चंद्रभागा तीराचा विकास, विठ्ठल मंदिर ते पालखी मार्ग यावरील विकासाकडे कॉरिडॉर निर्माण करताना खास लक्ष देण्यात येणार आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कॉरिडॉरला स्थानिक लोकांकडून व विविध पक्षांकडून विरोध होताना दिसून येत आहे.
आंदोलने, मोर्चे, निर्दशने होत आहेत. मात्र काहीही झाले तरी हा कॉरिडॉर होणारच आहे. यातून कोणाचेही नुकसान आम्ही करणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सगळ्यांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही फडणवीसांनी शेवटी सांगितले.
पंढरपूरचा विकास करणे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न असून जवळपास तीन हजार कोटी रूपये खर्च करून येथे विकास आराखडा राबविला जाणार आहे. प्रशासकीय पातळीवरील काम वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे मंदिर परिसर प्रशस्त करणाऱ्या माउली कॉरिडॉरला विरोध वाढत आहे. अनेक घरे व दुकाने यात पडतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे येथे सतत आंदोलन होत आहेत.
यातच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला आले असता त्यांनी भाषणात प्रसिध्द तीर्थक्षेत्रांचा विकास सुरू असल्याचे सांगताना केदारनाथ, काशी, उज्जैन व पंढरपूरचा उल्लेख केला. पंढरपूर वगळता अन्य ठिकाणी कामे झाली असून तेथे मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊन कामे मार्गी लागली आहेत. पंढरपूरमध्ये कॉरिडॉरला विरोध होत आहे. यामुळे पंतप्रधानांनी बाकी तीर्थक्षेत्रांबरोबर पंढरपूरचे नाव घेतल्याने येथेही आता केंद्र सरकारच्या माध्यतातून आराखडा राबविला जाणारच, अशीच चर्चा मोदी यांच्या भाषणानंतर सुरू झाली. या भाषणाची व्हिडिओ क्लिप सगळीकडे फिरत होती.
यानंतर दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आले असता, त्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यावर टिपण्णी करताना येथे विकासकामे व कॉरिडॉर वरून काही अफवा उठविल्या जात असल्याची खंत व्यक्त केली. पंढरपूरचा विकास करताना परंपरा, मंदिर, मठ यांना संरक्षित करून तसेच जनतेला विश्वासात घेऊनच कामे केली जातील, असे आश्वासन भाषणातून दिले.
श्री फडणवीस म्हणाले, पंढरपूरचा विकास करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही लोकांनी वाद निर्माण केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, कोणालाही उद्ध्वस्त करून कॉरिडॉर तयार केला जाणार नाही तर तो सर्वांना बरोबर घेऊन केला जाईल. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पंढरीतील पाचशे घरे, मठ, मंदिर कॉरडॉरमध्ये पडणार अशी जी चर्चा सुरू आहे. ती निरर्थक असून असा कोणताही कॉरिडॉर आम्ही करणार नसल्याची ग्वाही दिली.
दरम्यान फडणवीस यांनी जाहीरपणे कॉरिडॉर बाबतीत आपली भूमिका सोलापूर जिल्ह्यात येऊन स्पष्ट केल्याने काहीसा दिलासा पंढरपूरकरांना मिळाला आहे. शासनाने आपली पंढरपूरच्या विकासाबाबतची नेमकी भूमिका व आराखडा जर लवकर नागरिकांसमोर ठेवला तर याबाबतच्या अफवा ही बंद होतील.