अक्कलकोट : अक्कलकोटसाठी पुन्हा केंद्रीय रस्ते विकास निधीतून 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यातून अक्कलकोट ते जेऊर रस्ता 5.5 मिटरचा होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. Akkalkot to Jewar road will be five and a half meters long; Bring more funds MLA Sachin Kalyanshetty Rampur
अक्कलकोट तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधा निधीतून 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मंजूर कामात दोड्याळ ते जेऊर या रस्त्याचे रुंदीकरणांसह सुधारणा करणे यासाठी 5 कोटी रुपये तर शावळ फाटा ते कुडल ते देवीकवठे ते म्हैसलगी यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेला 6 किलोमीटरचा मार्ग हा सुधारणा करणे या कामासाठी 5 कोटी रुपये असा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही रस्त्यासाठी एकूण 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
यापूर्वी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात अक्कलकोट ते दोड्याळ रस्त्यासाठी सध्या असलेल्या 3 मिटरचा रस्ता रुंदीकरणातून सुधारणा करून तो 5.50 मिटरचा केला जाणार आहे. आता यावेळच्या निधीतून दोड्याळ ते जेऊर सुद्धा 5.50 मिटरचा होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अक्कलकोट ते जेऊर हा पूर्ण रस्ता 5.50 मिटरचा होणार असल्याने सध्या वाहतुकीला येत असलेले अडथळे दूर होणार आहे.
अक्कलकोट ते जेऊर रस्ता पूर्ण झाला तर सध्या सुरु असलेली तडवळ, मुंढेवाडी व कोर्सेगाव पर्यंत रस्ता येत्या काळात पूर्ण होऊन अक्कलकोट ते कोर्सेगावं रस्ता पूर्ण चांगला होणार आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी तिलाटी गेट वळसंग धोत्री मार्गे मुस्ती ते तांदुळवाडी, अक्कलकोट ते नागणसुर मार्गे बोरोटी सीमा, वागदरी ते भुरीकवठे तसेच धोत्री ते हन्नूर, चुगी, किणी ते काजिकणबस रस्ता यासाठी कोट्यावधीचा निधी दिलेला आहे.
या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सदरचे कमी अंतराचे आणि महत्वाचे रस्ते व्हावेत, अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. शेतमाल व इतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी व तालुक्यासाठी जोडणारे ठरणार आहेत. हे दोन्ही रस्ते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीवरून केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंजूर केला आहे.
सीमा भागासह माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी माझे वैयक्तिक लक्ष असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो सार्थ ठेवण्यासाठी प्रयत्न राहील. येत्या काळात केंद्र व राज्य शासन मार्फत उर्वरित रस्ते सुद्धा नवीन होण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
रामपूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. ते रामपूर (ता.अक्कलकोट) येथील ग्रामपंचायतीच्या २५ लाख रुपयेचे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते.
आ. कल्याणशेट्टी म्हणाले, रामपूर हा गाव मागील अनेक वर्षांपासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी म्हणावा तसा विकास केला नाही. तरीही ग्रामस्थांनी सतत आम्हाला साथ दिली आहे. यामुळे आता योग्य वेळ आली असून गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता आमची आहे. तरी ग्रामस्थांनी चिंता करण्याचे कारण नाही. सध्या दिलेले २५ लाखाचे कामे पूर्ण होताच आणखी निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले.
यावेळेस सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, उंबरगे सोसायटी चेअरमन सिद्धाराम बाके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता रविशंकर बोदले, नागराज कुंभार, गव्हरमेन्ट ठेकेदार विलास चव्हाण, सुरेश व्हाटे, ग्रा. प.सदस्य सोमशेखर दिंडुरे, निर्मला कोणदे, आंदव्वा बोलकोटगी, चिदानंद वाघमारे, मूलरीधर चव्हाण, ग्रामसेवक वाले,यांच्यासह मल्लिकार्जुन बिराजदार, सागर बिराजदार, शिवपुत्र रेऊरे, काळप्पा सुतार, बसवराज सुतार, लक्ष्मीपुत्र बिराजदार, बालाजी पाटील, दिलीप कदम उपस्थित होते.
रामपूर येथे अर्धा किलोमीटर अंतराचे १५ लाख रुपये खर्चाचे डांबरी रस्त्याचे लोकार्पण सोहळा. वेसीपासून हनुमान मंदिर पर्यंतचे ५ लाख रुपये खर्चाचे सिमेंट काँक्रीट रस्ता, ४ लाख रुपये खर्चाचे यलम्मा मंदिर संरक्षण भीतीचे भूमिपूजन, आशा विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.