सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोरील संरक्षक भिंतीजवळ असलेल्या कचराकुंडीत एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. Solapur. A newborn baby was found in a garbage dump in Civil Chowk
हे अर्भक सिव्हिल हॉस्पिटमधील की अन्य रुग्णालयातील याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आज मंगळवारी (ता. 13) दुपारी एकच्या सुमारास संरक्षक भिंतीजवळ कचरा वेचण्यासाठी आलेल्या एका महिलेला एक कॅरीबँगेमध्ये अर्भक दिसले. त्या महिलेने परिसरातील नागरिकांना याबाबतची माहिती सांगितली. त्यानंतर जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हे अर्भक शासकीय रुग्णालयात दाखल केले.
परंतु उपचारापूर्वीच बालकाचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी हे मृत अर्भक कोणाचे आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेल्या महिलेचे की अन्य हॉस्पिटलमधील आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
□ अंबिका नगरात विवाहित इसमाची गळफासाने आत्महत्या
सोलापूर – अक्कलकोट रोड परिसरातील अंबिका नगरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (ता.13) मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
योगीनाथ मल्लय्या हिरेमठ (वय ३८ रा. अंबिका नगर) असे मयताचे नाव आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीतील छताच्या लोखंडी अँगलला त्याचा मृतदेह वायरने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मयत योगीनाथ हिरेमठ हा मजुरी करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. तो दुपारी घरी येऊन भांडण करीत होता. त्यामुळे त्याची पत्नी आणि मुले माहेरी गेले होते. यादरम्यान त्याने आत्महत्या केली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार कांबळे पुढील तपास करीत आहेत.