□ आमदार देशमुखांवर भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने केला शाईफेकीचा प्रयत्न, पोलिसाच्या अंगावर पडली शाई
सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी- चिंचवडमध्ये शाईफेक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारी सायंकाळी सोलापुरात घडली. MLA Vijaykumar Deshmukh came with a change of shirt; Solapur Shaifek said nothing like that happened
भाजपचे आ. विजयकुमार देशमुख यांच्या अंगावर एका सामूहिक विवाह सोहळ्यात भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अवमानकारक व्यक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र भावना उमटत आहेत. त्यांचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. माफी मागितल्यावरही पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात आ. देशमुख यांच्या अंगावरही शाई टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सम्राट चौक परिसरातील न्यू सर्वधर्मीय सामूहिक विवाह बुधवार पेठ येथील बुध्दराष्ट्र प्रतिष्ठान यांच्यावतीने मंगळवारी (ता.13) सायंकाळी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. सायंकाळी त्याठिकाणी गेले असता एका भीमसैनिकाकडून आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित युवक भीम आर्मी संघटनेचा होता. त्या युवकाला जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://fb.watch/hpfVHZ0IbR/
○ पोलिसांवरही पडली शाई
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर राज्यातील सर्वच भाजप व शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. आ. विजय देशमुख यांनाही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. विवाहस्थळी गर्दी असल्यामुळे पोलिसांनी जादा बंदोबस्त लावला होता. तरीही भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने आ. देशमुखांवर शाईफेक करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलीस आणि अन्य नागरिकांच्या अंगावरही शाई पडली होती.
□ असे काही घडलेच नाही
याप्रकरणी आ. विजय देशमुख यांना संपर्क साधला असता असा काही प्रकार घडलाच नाही असे सांगून ते मोकळे झाले. अधिक विचारणा केली असता त्यांनी जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र माजी नगरसेवक संजय कोळी यांनी शापक करण्याचा प्रयत्न झाला, त्याचवेळी शाईफेक करणाऱ्यास पोलिसांनी पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असे सांगितले.
□ आमदार आले शर्ट बदलून
दरम्यान, आ. विजयकुमार देशमुख यांच्या शर्टवर शाईचे शिंतोडे उडाले. तोपर्यंतच शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यास पोलिसांनी पकडून नेले. तितक्यात आ. देशमुख यांच्या कार्यकत्यांनी दुसरा शर्ट आणला. त्यानंतर शाई पडलेला शर्ट बदलून आ. देशमुख विवाहसोहळ्यास थांबले, अशी माहिती विवाह सोहळ्यातील उपस्थितांकडून सांगण्यात आली.
● जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात तुफान गर्दी
दरम्यान, विवाहस्थळी असलेल्या पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या अजय मैंदर्गीकर या भीम आमच्या कार्या जागेवर पकडले. त्यामुळे विवाहस्थळी काहीवेळ गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी मैंदर्गीकर त्यास तात्काळ जोडपेठ पोलीस ठाण्यात आणले. यावेळी भाजपच्या कार्यकत्यांनी आणि आ. देशमुख समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. बाहेर गर्दी आणि पोलीस ठाण्यात कार्यवाही असे चित्र दिसत होते.
》 शरद पवारांना धमकी देणाऱ्याचा शोध लागला
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पवारांना देशी कट्ट्याने ठार मारू अशी धमकी देण्यात आली होती. त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारमधील रहिवासी आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन उद्यापर्यंत मुंबईत आणणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.