□ महाविकास आघाडी छुपा अजेंडा वापरत असल्याचा आरोप
□ भाजप- शिंदे गट – मनसे नेत्यांचे आव्हान
सोलापूर : महापुरुषाच्या अवामानाच्या निषेधार्थ १६ डिसेंबर रोजी सोलापूर बंदीमध्ये निर्माण मतभेद निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडीला स्वतःचा अजेंडा नसल्यामुळे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मंडळाचा वापर करत आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी सोलापूर बंदचा नारा दिला आहे. Disagreement over Solapur bandh: MNS, BJP, Shiv Sena show ‘Solapur Bandh’ on their own agenda if they dare.
त्यामुळे सोलापूर बंदला आमचा पाठिंबा नाही असे बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पत्रकार परिषद जाहीर केले, हिंमत असेल स्वतःच्या अजेंडावर सोलापूर बंद करून दाखवा असा इशारादेखील सोलापूर बंदचा नारा देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेते मंडळींना दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केले जात आहे. याच्या निषेधार्थ शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व धर्मीय १६ डिसेंबर रोजी सोलापूर बंदची हाक दिली आहे.
आता या सोलापूर बंद वरुन मतभेद निर्माण झाले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बंदला विरोध असून या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असे सांगत या बंदमध्ये कोणीही सहभागी होऊ नये असे बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, भारतीय जनता पार्टीचे अनंत जाधव, श्रीकांत घाडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर यांनी केले आहे आहे.
ज्यांच्याकडून महापुरुषाचा अनादर झाला, त्या लोकांचा जाहीर निषेधच आहे. मात्र अवमानकारक ज्यांनी वक्तव्य केली त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे माफी मागितली आहे मात्र काही राजकीय पक्ष काही संघटना अस्मितेचा विषय करून महाराष्ट्रासह सोलापूरची शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न जात आहे राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावाचा आधार घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सोलापूर बंदची हाक दिली गेली आहे.
राजकारणापोटी हा सोलापूर बंद केला जात आहे आपल्या नेते मंडळींना खुश करण्यासाठी शहरातील राजकीय मंडळी हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हा बंद शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून घोषित केला. मंडळाच्या माध्यमातून महाविकास आघाडी छुपा अजेंडा वापरत असल्याचा आरोप यावेळी या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळामध्ये अनेक मोठ मोठे मंडळे सहभागी होतात. या मंडळावर सर्वांचा अधिकार आहे. महाविकास आघाडीचा अजेंडा वापरून सोलापूर बंद करून दाखवा, मध्य मध्यवर्ती महामंडळाचा वापर राजकीय पक्षाच्या स्वार्थासाठी करु नये.
– अमोल शिंदे (जिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना)
● शिवजन्मोत्सव महामंडळाची स्थापना माझ्या वडिलांनी केली मात्र या मंडळाचा राजकीय वापर कधीच केला गेला नाही मी या मंडळाचा सदस्य आहे या मंडळाचा राजकीय राजकीय फायद्यासाठी वापर करणे चुकीचे आहे याला आमचा विरोधच आहे.
– श्रीकांत घाडगे (भाजपा)
● महापुरुषाचा आम्हाला आदर आहे. मात्र मध्यवर्ती महामंडळाच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाआघाडीतील नेतेमंडळी शिवभक्त आणि भीमसैनिकांची माथी भडकावत आहेत, याला आमचा विरोध आहे. या बंदमुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे महामंडळाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी कोणालाही भाजू देऊ देणार नाही.
– प्रशांत इंगळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
● अवमान प्रकरणी आम्ही आमच्या पातळीवर निषेध नोंदवला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पक्ष पातळीकडे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. सोलापूरला वेठीस धरणे योग्य नाही.
– अनंत जाधव (भाजप)
》सोलापुरात हिंदू जनजागृती आक्रमक; नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी करा कठोर कायदा
सोलापूर – मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हिचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळेच सोलापुरात हिंदू जनजागृती आक्रमक झाली असून रस्त्यावर आली आहे.
श्रद्धा वालकर प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही.
त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह ‘जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्धवस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, जिल्हा परिषद येथे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.
या प्रसंगी ‘रणरागिणी शाखेच्या समन्वयक अलका व्हनमारे यांसह हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे, दत्तात्रय पिसे, धनंजय बोकडे, सुरज मदनावाले यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी शहरातील धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या!’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या.