सोलापूर : कोल्हापूरचे असूनही सोलापूरवर विशेष जिव्हाळा असलेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या संपूर्ण महिनाभर आयोजित चक्री उपोषणाची विशेष व्यक्तिगत दखल घेत राज्यसभेत सोमवारी (ता. 12) होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली. दुसरीकडे सोलापूरचे लोकप्रतिनिधी या विषयावर गप्प का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. Kolhapur’s Dhananjay Mahadik ran for Solapur’s air service; MP Jayasidheswar Mahaswamy remained silent
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव, गणेश पेनगोंडा आणि रोहित मोरे यांनी मुंबई येथील मुख्यालयात कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली. त्यावेळी महाडिक यांनी सर्व बाबी विषयी सखोल माहिती जाणून घेत विमानसेवेचा मुद्दा संसदीय हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेन, असे आश्वासित केली होती.
खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सुताचे कारखाने, उद्योग असून सोलापूर जिल्हा जगभर सोलापुरी चादर पुरविण्याचे काम करतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी विमान सेवा गरजेची आहे. त्यामुळे होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यात यावी. अशी मागणी राज्यसभेत केली.
देशातील लहान शहरांना मोठ्या शहराची जोडणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असणारी उड्डाण योजनेंतर्गत सोलापूर होटगी रोड विमानतळ विमानतळावरून नागरिक प्रवासी वाहतूक सुरू करण्यात यावी, असे यावेळी खा. महाडिक म्हणाले. सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभर चक्री उपोषण करण्यात आले होते. दरम्यान, महाडिक हे कोल्हापूरचे खासदार असून त्यांनी सोलापूर विमानसेवेचा मुद्दा उपस्थित केल्याने शहातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● सोलापूरचे प्रतिनिधी गप्पच
खा. महाडिक यांनी सोलापूर विमानसेवेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सोलापूरचे लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का असा प्रश्न आता व्यापारी आणि सोलापूरकर उपस्थित करत आहेत. विकासाच्या नावाखाली निवडून यायचे आणि नंतर मात्र त्यापासून फारकत घ्यायची असले काम सोलापूरचे प्रतिनिधी करत असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले.
■ खा. महास्वामींकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल : शहा
खा. धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे आहेत. मात्र सोलापूर विमानतळा संदर्भात त्यांना आस्था आहे. ज्या तमाम सोलापूरकरांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना खासदार केले. ते मात्र सोलापूर होटगी रोड विमानतळ प्रश्नासंदर्भात मौन धारण करून शांत आहेत अनास्था दाखवत आहेत, अशी टिका सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी केली.
सोलापूर होटगी रोड विमानतळा संदर्भात मध्यंतरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीतही खा. डॉ. महास्वामी यांनी पालकमंत्र्यांची दिशाभूल केली. त्यामुळे त्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही, असा आरोप ही शहा यांनी केला. मोदी यांनी सुरू केलेल्या उड्डाण योजनेला खीळ घालण्याचे काम खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे करीत आहेत. ही बाब मतदार लक्षात ठेवतील, असेही ते म्हणाले.