Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बायोमेडिकल वेस्ट कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्या  सोलापुरातील हॉस्पिटलवर केली दंडात्मक कारवाई

Punitive action taken against hospital in Solapur for dumping biomedical waste in public places Indira IVF

Surajya Digital by Surajya Digital
December 15, 2022
in Hot News, सोलापूर
0
बायोमेडिकल वेस्ट कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्या  सोलापुरातील हॉस्पिटलवर केली दंडात्मक कारवाई
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील सात रस्ता परिसरात असलेल्या होमगार्ड मैदानाजवळील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. Punitive action taken against hospital in Solapur for dumping biomedical waste in public places Indira IVF

सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी नुकतेच सूचित केले आहे. तर दुसरीकडे बायो मेडिकल वेस्ट कचरा टाकणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील सात रस्ता परिसरात असलेल्या होमगार्ड मैदानाजवळील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली आहे.

येथील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलकडून बायो मेडिकल वेस्ट कचरा टाकल्याप्रकरणी कारवाई करून ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

दरम्यान, यापूर्वी सोलापूर शहरातील अनेक रुग्णालयांवर रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट साहित्यकचरा रस्त्यावर, उकिरड्यावर आणि इतरत्र  टाकून दिल्या प्रकरणी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला होता. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वत्र तपासणी आणि कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकल्यास तसेच बायो वेस्टही इतरत्र टाकण्यात आल्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ सोलापूर । ट्रॅक्टरच्या कालव्याच्या फाट्यात कोसळला पाच ठार; दोन बालकांचा समावेश

पंढरपूर : करकंब येथील उजनी डावा कालव्याच्या 33 नंबर फाट्यामध्ये ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन मायलेकरांसह पाच जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मायलेकरासह पाचजण ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मृत हे सर्वजण मध्य प्रदेशातील ( मु पो कोलकी ता वारला जि बडवाणी) येथील असून ट्रॅक्टर चालकाविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर दोन येथील व कामगार होते.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (ता.13) रात्री सव्वाअकराच्या सुमारास उसाचा ट्रॅक्टर भरून कारखान्याकडे रवाना केल्यानंतर ऊसतोड कामगार एमएच 45 एस 1183 ह्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून ते राहत असलेल्या मदने वस्तीकडे निघाले होते.

 

यावेळी ट्रॅक्टर बागवान वस्तीजवळील डाव्या कालव्याच्या फाट्यामध्ये कोसळला. यामध्ये ट्रॉली पूर्ण पलटी होऊन त्याखाली सर्व कामगार अडकले होते. कामगारांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला करून सर्वांना करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सरवदे यांनी अरविंद राजाराम कदछे ( वय 2), प्रिया नवलसिंह आर्या (वय 2), सुरीका विरसिंग डावर (वय 16), मकबाई नवलसिंग आर्या (वय 23) सर्वजण राहणार कोलके, ता.वरला, जि. बडवाणी (मध्य प्रदेश) यांना मृत घोषित केले. राजाराम देवसिंग कवछे (वय 23), रिंकू सुमरिया कवछे (वय 16) व सुनीता राजाराम कवछे (वय 23) ह्या जखमींवर उपचार सुरू आहेत. दोन जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पण त्यापैकी एकाच तेथे सुनीताबाई राजराम कवछे (वय 23) मयत पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला असून एकावर उपचार चालू आहेत.

घटनेची माहिती समजताच करकंबचे जुबेर बागवान, दत्तू देशमुख , उपसरपंच आदिनाथ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे आदींनी अपघातग्रस्तांना मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे करत आहेत.

Tags: #Punitive #action #hospital #Solapur #dumping #biomedical #waste #publicplaces #IndiraIVF#बायोमेडिकल #वेस्ट #कचरा #सार्वजनिक #ठिकाणी   #सोलापूर #हॉस्पिटल #दंडात्मक #कारवाई #इंदिराआईव्हीएफ
Previous Post

सोलापूर । ट्रॅक्टर कालव्याच्या फाट्यात कोसळला; पाच ठार, दोन बालकांचा समावेश

Next Post

अतिरिक्त आयुक्तपदी संदिप कारंजे यांची नियुक्ती; कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त प्रवास

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अतिरिक्त आयुक्तपदी संदिप कारंजे यांची नियुक्ती; कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त प्रवास

अतिरिक्त आयुक्तपदी संदिप कारंजे यांची नियुक्ती; कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त प्रवास

वार्ता संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697