● तांत्रिक अडचणीचे कारण; खरे कारण गुलदस्त्यात
सोलापूर : उपविभागीय क्र. एकचे अधिकारी हेमंत निकम यांच्या कामाच्या चौकशीसाठी पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली साताराच्या उपजिल्हाधिकारी संगिता राजापूरकर- चौगुलेसह जिल्हापुरवठा अधिकारी विवेक साळुंखे याची नियुक्ती केली होती. १४ ते १६ डिसेंबर तीन दिवस निकम यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली जाणार होती. मात्र तपासणी समितीचा दौरा अचानक स्थगित झाला आहे. Solapur. District administration suspends inquiry into corrupt work of district officer Hemant Nikam
तांत्रिक कारण सांगितले जात असलेतरी वेगळीच चर्चा जिल्हाप्रशासनात चालू आहे. प्रात अधिकारी हेमंत निकम भ्रष्टाराचे अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आले आहेत. याबाबत विभागय आयुक्त तसे केंद्रशासन, राज्यशासान आणि सीबीआय कडे तक्रारी दाखल आहेत. माजी मंत्री अॅड. दिलीप सोपल, सोलापूरचे सामाजीक कार्यकर्ते संदिप शितोळे, जयराज नागणसुरे यांनी तक्रारी करत निकम यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन तीन जणांच्या समितीची नियुक्ती केली आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोलापूरात १४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार होते. सलग तीन दिवस प्रात अधिकारी निकम यांच्या कार्यालयाची तपासणी केली जाणार होती. तसे पत्र तपासणी अधिकारी आणि तक्रारदार तसेच उपविभागिय अधिकारऱ्यांना सूचना तपासणी पथाकच्या अध्यक्षांनी दिल्या होत्या.
मात्र तपासणी समितीचा दौरा अचानक रद्द झाला आहे. तांत्रिक अडचणी मुळे ह चौकशी स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरून पुढील आदेश प्राप्त होताच चौकशी कामाची पुढील तारिख वेळ ठरणार आहे. मात्र अचानक चौकशी समितीचा दौराच रद्द झाल्याने उलट सुलट चर्चा जिल्हाप्रशासनात चालू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 प्रांताधिकारी निकम यांच्या भ्रष्ट कामाच्या चौकशीसाठी समिती येणार होती सोलापुरात
सोलापूर : सोलापूर उपविभागीय क्रमांक एकचे अधिकारी हेमंत निकम यांच्या भ्रष्ट कामाविषयी अनेक तक्रारी शासन पातळीवर दाखल झाल्या आहेत. याकामाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी आहे. या तक्रारीची दखल घेतली आहे.
दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, सह जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांची नियुक्ती केली असून १४ ते १६ डिसेंबर तीन दिवस निकम यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेत तपासणी केली जाणार आहे.
निकम यांच्या गैर कामांविषयी अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. याबाबत विभागीय आयुक्त, केंद्रशासन, राज्यशासन आणि सीबीआयकडे तक्रारी दाखल आहेत. माजी मंत्री ॲड. दिलीप सोपल, सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे, जयराज नागणसुरे यांनी तक्रारी करत निकम यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तीन जणांच्या समितीची नियुक्ती केली आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती सोलापुरात १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहे.
सलग तीन दिवस निकम यांच्या कार्यालयाची तपासणी केली जाणार आहे. तसे पत्र तपासणी अधिकारी आणि तक्रारदार तसेच निकम यांना प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. निकम यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व महसुली कामांच्या सर्व संचिका तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना तपासणी पथकाच्या अध्यक्षांनी दिल्या आहेत.
■ काय आहे नेमके प्रकरण
पदावर नसताना राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या जमिनीचा बोगस निवाडा देऊन तब्बल सात कोटींचा अपहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे यांनी केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या सीबीआयकडे केली आहे. प्रकरणाची चौकशी करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
■ निवाडा बदलण्याचा अधिकार कोर्टास
भूसंपादन केलेल्या जागेचा निवाडा झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार न्यायालयास आहे. निकम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पदावर नसताना कागदपत्रामध्ये फेरफार करत निवाडामध्ये बदल करत शासनाची फसवणूक केली. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत निकम यांची चौकशी करण्याची मागणी आहे. याबाबतचे सर्व पुरावे दाखल केले आहेत. चौकशी समितीपुढे पुन्हा हे पुरावे सादर केले जातील, असे तक्रारदार संदीप शितोळे यांनी सांगितले.
● जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन वेळा तपासणी
हेमंत निकम यांच्या कार्यालयाची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन वेळा तपासणी केली आहे. काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. निकम यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.. आता या तपासणी पथकाच्या माध्यमातून काय सिध्द होते हे पाहावे लागणार आहे.