पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध दहा वर्षे सत्ता मजुरीची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. Solapur. 10 years forced labor rape to father-in-law who abused daughter-in-law Pandharpur
पंढरपूर तालुक्यातील महादेव दाजी बनसोडे यास शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी बनसोडे याने 16 एप्रिल 2021 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये नातेसंबंधाचा गैरफायदा घेऊन सुनेवर बलात्कार केला. हा प्रकार वारंवार होत असल्यामुळे पीडित महिलेने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयात सदर खटला सुरू झाल्यानंतर सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये पीडित महिला, तिचे वडील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप केचे, डॉ. स्वाती बोधले, हवालदार शिवाप्पा बिराजदार व पोलीस तपास अधिकारी प्रकाश मोरे यांचा समावेश आहे. आरोपीच्या वतीने सदर मुद्दे खोडून काढण्यात आले. मात्र सक्षम पुरावे व महत्त्वाच्या साक्षी यामुळे आरोपी महादेव बनसोडे यास दहा वर्षे सक्त मजुरी व दंड सुनावण्यात आला.
आरोपी 5 ऑगस्ट 2021 पासून अटकेत असून त्यास अद्याप जामीन मिळाला नाही. या खटल्यात सरकारच्या वतीने ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पंढरपुरात मतिमंद महिलेवर बलात्कार
पंढरपूर शहरात एक 40 वर्षीय अविवाहित मतीमंद महिलेवर गायीच्या गोठ्यात बलात्कार करून गर्भवती केलाच धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. अर्जुन सूर्यकांत कदम याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
गेल्या सहा-सात महिन्यापासून पीडितेवर घरात कोणी नसताना तसेच गायीच्या गोठ्यात बोलावून मतिमंद असल्याचा फायदा घेऊन अर्जुन कदम याने अनेक वेळा बलात्कार केला आहे. ज्यावेळी पीडिता गोठ्यात जाण्यास नकार देत होती, त्यावेळी तिला दम देऊन, शिवीगाळ करून मारहाण करायचा तसेच जीव मारण्याची धमकी द्यायाचा. त्यामुळे घाबरून पीडिता त्याच्यासोबत गोट्यात जायची आणि तो तिच्यावर बलात्कार करायचा, अशी फिर्याद पिडीतेच्या बहिणीने पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे.
पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने फिर्यादीला काहीतरी वेगळे घडल्याचा संशय आल्याने पीडितेला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. अर्जुन कदम याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत करत आहेत.