● संजय राऊतांचा नवा लूक चर्चेत; सभेनंतर सुषमा अंधारे व्यासपीठावर
मुंबई : मुंबई येथे महाविकास आघाडीकडून आज विशाल महामोर्चा काढण्यात आला. या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. राज्यपाल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल टिंगलटवाळी करत आहेत. ही टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे. त्यांची लवकर पदावरून हकालपट्टी करा, असे पवार म्हणाले. Bhagatsinh Koshyari Governor should feel ashamed, Mahamorcha dismissed the Governor
Sanjay Raut Sharad Pawar Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्यावतीने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल आणि भाजपवर हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले, आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.
आजचा हा मोर्चा एका वेगळ्या परिस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईत लाखोंचा मोर्चा निघाले होते. अजून महाराष्ट्रात येण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांचा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव निपाणी कारवारमधील जनतेकडून सातत्याने महाराष्ट्रात सहभागी होण्याची मागणी केली जात असल्याकडे शरद पवारांनी लक्ष वेधले.
महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत झाला. यामध्ये बोलताना संजय राऊत यांनी, ‘आजच्या मोर्चाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमिस केले आहे, गव्हर्नर डिसमिस सांगणारा हा मोर्चा आहे, हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हा मोर्चा म्हणजे एक इशारा आहे, आज महाराष्ट्र जागा झाला आहे,’ म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कोश्यारी यांनी केलेल्या विधानाविरोधात हा मोर्चा आहे.
मुंबई येथे महाविकास आघाडीकडून आज विशाल महामोर्चा काढण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले आहेत.
मुंबई येथे महाविकास आघाडीकडून आज विशाल महामोर्चा काढण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मविआचे सर्व नेते सहभागी झाले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील मोर्चात सहभागी झाल्या आहेत. त्यांची मोर्चात सहभागी व्हायची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबई येथे महाविकास आघाडीकडून आज विशाल महामोर्चा काढण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मविआचे सर्व नेते सहभागी झाले आहेत. अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे हे सर्व मोर्चात सहभागी झाले आहेत. काही वेळाने शरद पवारही यात सहभागी झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● संजय राऊतांचा नवा लूक चर्चेत
खासदार संजय राऊत आज महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या महामोर्चात सहभागी होणार आहेत. त्याआधी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी शिंदे सरकावर हल्लाबोल केला आहे. यावेळी राऊत यांचा नवा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या गळ्यात भगवा मफलर, जोडीला निळे उपरणे, डोक्यावर निळी पगडी होती. राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबाबत चुकीचे विधान केल्याने भाजपाने आज माफी मांगो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
संजय राऊत हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत आहेत आणि ते आजही उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळेच त्यांना जेव्हा पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाली होती त्यावेळी भावनिक आव्हान करताना त्यांनी भगवं उपरणं गळ्याभोवती गुंडाळलं होतं. मग आज अचानक निळा फेटा आणि निळं उपरणं का, असा सवाल अनेकांना पडला आहे. यामागचं कारण थेट त्यांनी सांगितलं नसलं तरी राऊतांच्या या लूकची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या महा मोर्चाआधी काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी संजय राऊत यांनी निळा फेटा आणि निळं उपरणं घातलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. या विधानावरून भाजपने संजय राऊत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका केली होती. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर तोड डागली आणि त्यांच्याविरोधात आज मुंबईत माफी आंदोलन करण्याची घोषणा केली. या साऱ्या पडसादानंतर डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांची मनं जिंकण्यासाठी राऊत यांनी हा नवा लूक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळातसह सोशल मीडियावर दिसून आली आहे.
● सभेनंतर सुषमा अंधारे व्यासपीठावर
मविआचा मुंबईत आज महामोर्चा निघाला. पण या मोर्चात शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे अनुपस्थित होत्या. वारकरी संप्रदायातील संतांवरील केलेल्या टीकेमुळे त्या वादात सापडल्या आहेत. वारकऱ्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान अंधारेंनी स्टेजवर येऊन शरद पवार व उद्धव ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. पण त्यांची मोर्चातील अनुपस्थिती अधोरेखित करत होती.
वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे सध्या संकटात सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधात आज ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे. तर पक्षाने सांगितल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच आज महाविकास आघाडीचा मोर्चा मुंबईत मात्र यात सुषमा अंधारे दिसलेल्या नाहीत.