सोलापूर : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताच्या पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर शहरातील दाजी पेठ येथे आंदोलन केले. या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा पुतळा जाळला. MLA Subhash Deshmukh burnt effigy of Pakistan in Solapur, clashed with police and BJP workers
जेलरोड पोलिसांनी पाकिस्तानचा पुतळा जाळणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत झटापट झाली. तरीही भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमकता दाखवली. झटापट होऊन देखील पोलिसांना बाजूला करत, पाकपुतळा दहन केला.
दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, पाकिस्तान देश भरकटत चालला आहे. त्यांचे मंत्रिमंडळ देखील भरकटत आहेत, बिलावल भुट्टो यांनी भारताच्या पंतप्रधान विरोधात अश्लील वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने भारताची माफी मागितली पाहिजे, अन्यथा भारतात पाकिस्तान विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप सोलापूर शहराच्या वतीने भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून पाकिस्तानसोबत बिलावलचा पुतळा जाळले.
यावेळेस आमदार सुभाष देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाचे लक्ष वळवणे आणि दिशाभूल करणे, असा या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे म्हणाले, रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कसे वाचवले हे जगाने पाहिले आहे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक व्यासपीठावर आपली अमिट छाप सोडली आहे, पण दुसरीकडे पाकिस्तानची थट्टा आणि अपमान सहन करावा लागत आहे. बिलावल यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करण्याइतपत बिलावल यांचा कौल योग्य नाही.
यावेळेस संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, सरचिटणीस शशी थोरात,माजी महापौर श्रीकांचना यन्नम, जय साळुंके, भाजपा ज्येष्ठनेते रामचंद्र जन्नू , पांडुरंग दिड्डी, प्रशांत फत्तेपूरकर, भूपतीशेठ कमटम, दीनानाथ धुळम, चंद्रकांत तापडिया, विजयाताई वड्डेपल्ली, रेखा गायकवाड, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, श्रीनिवास जोगी , रुचिरा मासम, डॉ शिवराज सरतापे, बसवराज केंगनाळकर, गणेश पेनगोंडा, बाबुराव संगेपान, जयंत होले पाटील, दत्ता पाटील, रवी भवानी, सिद्धेश्वर मुनाळे, शिवशरण बब्बे ,महेश देवकर, मधुकर वडनाल, बिपीन धुम्मा, नागेश गंजी , विजय इप्पाकायल, सतीश भरमशेट्टी, अंबादास लोकुर्ती, प्रकाश म्हंता, सुकुमार सिद्धम ,लिंगराज जवळकोटे, नगरसेवक अविनाश बोंमड्याल, नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, राधिकाताई पोसा, विमल पुठ्ठा, अर्चना वडनाल, युवा मोर्चाचे गणेश साखरे, प्रेम भोगडे, श्रीपाद घोडके, बिपिन धुम्मा ,नरेश पतंगे, मल्लिनाथ कुंभार, गिरीश बत्तुल, भीमाशंकर बिराजदार , दत्तू पोसा, सतीश महाले, अक्षय अंजीखाने उपस्थित होते.
पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टोंनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्यात ठिकठिकाणी भुट्टोंच्या फोटोला जोडे मारले आहेत. तसेच त्यांची प्रतिमा जाळण्यात आली आहे. मुंबईमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रविण दरेकर या नेत्यांच्या नेतृत्वात भाजपने हे आंदोलन केले. यावेळी भुट्टोंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
● ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी यांचे निधन
बार्शी : ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त मडलअधिकारी कवी व गझलाकार शब्बीर मुलाणी (वय 65) यांचे राजी 12.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुन, जावाई व नातवंडे असा परिवार आहे.
मुलाणी कवी कालिदास मंडळाचे माजी अध्यक्ष तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी सह कार्यवाह होते. बार्शी ग्रामदैवत श्री भगवंत यांच्यावर त्यांनी केलेली काव्यरचना अप्रतिम आहे. त्याचे काव्यसंग्रह व गझलावर ही अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.