Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर । भारताच्या अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे जोडीला दुहेरीचे विजेतेपद

win doubles title Balaji Amines Solapur Open $25000 Women's Tennis Tournament

Surajya Digital by Surajya Digital
December 17, 2022
in Hot News, खेळ, सोलापूर
0
सोलापूर । भारताच्या अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे जोडीला दुहेरीचे विजेतेपद
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धा

□ अनास्तासिया कुलिकोवा, प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो यांचा अंतिम फेरीत प्रवेश

 

सोलापूर : सोलापुरात आयोजित बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे जोडीला दुहेरीचे विजेतेपद मिळाले आहे. अनास्तासिया कुलिकोवा, प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो यांचा अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. Solapur. India’s Ankita Raina, Prathanna Thombre win doubles title Balaji Amines Solapur Open $25000 Women’s Tennis Tournament

 

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या अव्वल मानांकीत जोडीने केवळ 55 मिनिटाच्या लढतीत इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो व रशियाच्या एकटेरिना याशिना या दुस-या मानांकीत जोडीचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत फिनलँडच्या तिस-या मानांकीत अनास्तासिया कुलिकोवा हिने भारताच्या अव्वल मानांकीत अंकिता रैनाचा 5-7, 7-5, 6-3 असा तर इंडोनेशियाच्या आठव्या मानांकीत प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहोने रशियाच्या डारिया कुडाशोवाचा 1-6, 6-4, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 सोलापूर जिल्ह्यात गोवरचे लसीकरण सुरू, सहा रूग्ण आढळले

 

सोलापूर : राज्यभरात गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून गोवर लसीकरणास मोहिमेस गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

शेती, वीटभट्टी, साखर कारखाने आदी. परिसरात जाऊन आरोग्य विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत बालकांना वयाच्या ९ ते १२ महिन्यांत गोवर रुबेला लसीचा पहिला डोस देण्यात येतो. तसेच १६ ते २४ महिने वयाच्या कालावधीत दुसरा डोस दिला जातो. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ग्रामीण भागात १ तर शहरात पाच गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

नियमित लसीकरणाच्या अहवालानुसार जिल्ह्यात गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसऱ्या डोसचे काम हे ९५ टक्के इतके झाले आहे.’ सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार लसीकरण लाभार्थी न झालेल्या मुलांची यादी तयार करण्यात आली आहे.

 

सर्व मुलांना लस दिल्याची खात्री वैद्यकीय अधिकारी, समुदाय अधिकारी हे करणार आहेत. तर थेट शेती, वाड्या वस्त्यावर जाऊन अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी हे लसीकरण करणार आहेत.

Tags: #Solapur #India's #AnkitaRaina #PrathannaThombre #win #doublestitle #BalajiAmines #SolapurOpen #$25000 #Women'sTennis #Tournament#सोलापूर #भारत #अंकितारैना #प्रार्थनाठोंबरे #जोडी #दुहेरी #विजेतेपद #बालाजीअमाईन्स #सोलापूरओपन #डॉलर #महिलाटेनिस #स्पर्धा
Previous Post

सोलापुरात पाकपुतळ्याचे दहन, पोलिसांची व भाजप कार्यकर्त्यांची झटापट

Next Post

जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या गुन्हेगाराकडून चोरीचे दागिने जप्त; कुमार करजगींच्या घरातील कामगारच निघाला चोर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या गुन्हेगाराकडून चोरीचे दागिने जप्त; कुमार करजगींच्या घरातील कामगारच निघाला चोर

जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या गुन्हेगाराकडून चोरीचे दागिने जप्त; कुमार करजगींच्या घरातील कामगारच निघाला चोर

वार्ता संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697