● धर्मराज काडादींची नामोल्लेख न करता विजयकुमार देशमुखांवर टीका
सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी बचावसाठी आज सोलापुरात मोठे शक्तिप्रदर्शन केले. हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आज हजारो हितचिंतक, समर्थक, सभासद रस्त्यावर उतरले होते. सभेत धर्मराज काडादी यांनी भाषणातून अनेकांचा आपल्या शैलीत समाचार घेतला तर शेवटी आवर्जून मदत घेतलेल्याचे नावे घेत आभारही मानले. Thousands of supporters on the streets for the ‘chimney rescue’ of Sri Siddheshwar Sugar Factory
आज झालेल्या मोर्चात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, सभासद, कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक रस्त्यावर उतरले होते. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम, सिद्रामप्पा पाटील, सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, बळीरामकाका साठे, चेतन नरोटे अनेक नेत्यांची भाषणे झाली. कारखाना कार्यस्थळापासून सकाळी 9.30 वाजता या विशाल मोर्चाला सुरुवात होईल. हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, जुना होटगी नाका, सात रस्ता, रंगभवन मार्गे मोर्चा होम मैदान येथे पोहोचेल. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
याआधी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलने झाली होती. या महिन्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते. विमानतळाच्या मुद्यावरून सोलापूरमधील वातावरण चांगलेच तापले असताना आज सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोरामणी येथे विमानतळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीद्वारे होटगी येथील विमानतळाच्या मागणीला पर्याय देण्यात आला.
सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी म्हटले की, मला आणि कारखान्याला विरोध करण्यासाठी काही मंडळींचे षडयंत्र सुरू आहे. आम्ही सर्व काम नियमानेच करत आहोत, मात्र वारंवार कोर्टात धाव घेऊन काही मंडळी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पडद्यामागे असलेल्या व्यक्तींचा खुलासा योग्य वेळी करणार, आम्ही संयमाने काम करत असल्याचे म्हटले.
मागील अनेक वर्ष आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वांना लढा दिला. मात्र आता सभासद स्वतःहून रस्त्यावरती उतरत आहेत. आज निघणारा मोर्चा हा सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचा आहे, याला कुठलाही राजकीय अजेंडा नाही असेही त्यांनी म्हटले. कारखाना वाचवण्यासाठी विधीमंडळातील सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी बोरामणी विमानतळ सुरू होण्यासाठी सभागृहात आवाज उठवावा, अशी मागणी देखील धर्मराज काडादी यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात अप्रत्यक्षपणे आमदार विजय देशमुखवर प्रहार करत उत्तर सोलापूरचे नेतृत्व बदलण्याची मागणी नाव न घेता केली. यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. सभेत धर्मराज काडादी यांनी आमदार विजयकुमार देशमुखांचा उल्लेख न करता म्हणाले की, तीन वेळा आमदार झाले. तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मंत्रिमंडळ घेताना मला जेव्हा विचारणा झाली त्यावेळी आपण सकारात्मक प्रतिसाद देत चांगला माणूस आहे. त्यामुळे मंत्रिमंडळास्थान द्या, असे सांगितले. मात्र ज्या दिवसापासून ते मंत्री झाले तेव्हापासून कारखान्याच्या विरोधात आणि माझ्या विरोधात काम करण्यास सुरुवात केल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न आरोप केला. यावेळेस सभेचा समारोप करताना कारखान्यासाठी सहकार्य करणा-यात प्रथम शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते – पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजयमामा शिंदे, बबनराव शिंदे, प्रणिती शिंदे, जयंत पाटील, सोलापूरचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटीलसह अनेकांची नाव घेत आभार मानले. पण यात माजी मंत्री, पालकमंत्री विजयकुमार देशमुखांचे नाव टाळले. मोर्चातील शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
बोरामणी येथे राज्य सरकारने मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमानतळावरून तूर्त विमानसेवा एका बाजूने सुरू करावी, कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात आणि दरवर्षीच्या गाळप हंगामात कारखान्यास जाणूनबुजून दिला जाणारा त्रास कायमस्वरुपी थांबवावा, अशी मागणी निवेदनात केली.
या मागण्यांसाठी आज सोमवारी सकाळी कारखाना कार्यस्थळापासून होम मैदानापर्यंत शेतकर्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी व बोरामणी येथील नियोजीत आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरु व्हावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह शेकडो शेतकरी कुमठे येथील श्री सिध्देेश्वर साखर कारखाना ते होम मैदान असे सलग पाच किलोमीटरचे अंतर पायी चालत मोर्चात सहभाग घेतला.
कारखाना कार्यस्थळापासून सकाळी 9.30 वाजता मोर्चास सुरुवात झाली. हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, जुना होटगी नाका, सात रस्ता, रंगभवन मार्गे मोर्चा होम मैदान येथे पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर होणार आहे. या मोर्चात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, शेतकरी संघटनेचे नेते जाफरताज पाटील, अख्तरताज पाटील, शिवानंद दरेकर, इक्बाल मुजावर, अमोल हिप्परगी, अंकुश आवताडे, बोरामणी विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष राजू चव्हाण, कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, सिध्देश्वर साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार आदी उपस्थित होते.
मोर्चाच्या दर्शनस्थळी चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आले आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या मोर्चामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी गाड्यासह हजारो सभासद, कामगार व विविध पक्षातील लोक उपस्थित होते. या मोर्चामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यासह कर्नाटक, लातूर, उस्मानाबाद, उमरगा, नळदुर्ग आदी भागातील कारखान्यांचे सभासद व शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. राजकीय सर्वपक्षीय राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.