□ फडणवीस – पवार सभागृहात भिडले; फडणवीस म्हणाले तुमच्याकडूनच शिकलोय
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन कालपासून नागपूर येथे सुरु आहे. यावेळी विधानपरिषेदत हंगामा झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांविषयी विधानपरिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला उभे राहिले असता ठाकरे गटाच्या आमदारांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सभापतींनी सभागृह तहकूब केले. यावर हे बरोबर नाही, असे फडणवीस म्हणाले. This is not right…. Devendra Fadnavis raged in the House; Speaking to reply, the House adjourned the winter session
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसर दणाणून सोडला. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. यावेळी सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा विरोधकांच्या घोषणाबाजीने सुरू झाला.
विधान परिषदेमध्ये जोरदार गोंधळ झाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मध्येच थांबवून कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले, त्यामुळे फडणवीस कमालीचे संतापले. विधान परिषदेमध्ये आज शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे हे हजर होते. यावेळी त्यांनी आक्रमकपणे महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांवर बाजू मांडली. या मुद्दावर उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
यावेळी विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे यांनी गोंधळ पाहता 15 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं. सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यामुळे फडणवीस कमालीचे संतापले. ‘हे बरोबर नाही’ असं म्हणून नाराजी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
अजितदादांनी कामांना स्थगिती देण्यावरुन सरकारवर निशाणा साधला. यावरुन फडणवीसांनी तुमच्याकडूनच शिकलो असा पलटवार केला. मविआ सरकार असताना माझ्या मतदारसंघातील कामे तुम्ही रोखली, पण आम्ही असे करणार नाही, असे फडणवीस म्हणाले. अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील विकासकामाला स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. अजित पवार विकासकामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते.
सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, स्थगिती सरकार हाय हाय, 50 खोके एकदम ओके’, अशा घोषणा विरोधकांकडून यावेळी देण्यात आल्या. अजित पवार यांनी स्थगितीचा मुद्दा उचलून धरला.
यावर देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत अजित पवारांना उत्तर दिले. तुम्ही सात वेळा आमदार म्हणून निवडून आलात. आम्ही कमी वेळा निवडून आलो. पण काही गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आले, तेव्हा तुम्ही आमच्या सर्व विकासकामांवर रोख लावला होता, असे फडणवीस म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आम्ही आवश्यक त्या सर्व स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे गरज आहे, तिथेच स्थगित्या ठेवल्या आहेत. लवकरच त्या संदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असा भेद करत नाही. कुणावरही अन्याय केला गेला नाही. आम्ही तुम्हालाही त्याची माहिती देऊ, असे फडणवीसांनी सभागृहात म्हटले.
माझ्या स्वत: च्या मतदार संघातील कामे महाविकास आघाडीच्या सरकारने रोखली होती. आम्हाला गेल्या अडीच वर्षात एक नवा पैसा दिला नाही. आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही. आम्ही 70 टक्के स्थगित्या उठवल्या आहेत. 30 टक्के स्थगित्या काही तरतुदींमुळे कायम ठेवल्या गेल्या आहेत.
त्यावरही निर्णय घेऊन लवकरच त्या देखील उठवल्या जातील, असे फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे काल सुरु झाले. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताबा मिळवला. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभु हे व्यवस्था पाहत असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट तिथे आले व त्यांनी एकमेकांना नजरेनेच खुन्नस दिली.
● मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन केले.
जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला… राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या… या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय… खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ‘ED’ सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरातील १०० कोटीचे भूखंड २ कोटीत विकून भ्रष्टाचार केला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली.
राज्य सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा देत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधान परिषद ते विधान सभेच्या पायऱ्यांपर्यंत घोषणा देत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी भाई ठाकूर व विधानपरिषदेचे विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते.
न्यायलयाने या प्रकरणात स्थगिती दिली असतानाही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हा घोटाळा केला असल्याचा आरोप दानवे यांनी केला. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सारवासारव करीत सरकारला वाचविण्याचा प्रयत्न केला. ते मुख्यमंत्री असताना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे फडणवीस यांनी पचविल्याचा आरोप भाई जगताप यांनी यावेळी केला.
□ ग्रामपंचायत निकालात मोठा उलटफेर
राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. एकूण 7 हजार 135 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत जवळपास 4 हजार ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. महाविकास आघाडीने जवळपास 1500 आणि भाजप- शिंदे गट यांनी 1500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. तर इतर पक्षांनी 600 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवल्याचे सध्या चित्र आहे.