□ न्याय न मिळाल्यास पतीच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा
सोलापूर : करमाळ्यातील मयत शिक्षकाच्या पत्नीची देय रकमा देण्यावरून जिल्हा परिषदेकडून उपेक्षा होत आहे. न्याय न मिळाल्यास पतीच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी माध्यमाद्वारे प्रशासनाला दिला आहे. The Zilla Parishad is neglecting the deceased teacher’s wife to pay the amount due to Solapur Karmala
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील शिक्षक हरी गोपीनाथ काळे यांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांच्या पत्नीला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देय रकमा मिळाल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नीला चक्क घरामध्येच अस्थी ठेवून जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेकडून न्याय नाही मिळाल्यास झेडपीसमोर पतीच्या अस्थिंसह आंदोलन करणार असल्याचा इशारा सुप्रिया काळे यांनी दिला आहे.
हरी काळे यांचा मृत्यू २५ मार्च २०२२ रोजी किडनी विकारामुळे झाला होता. काळे हे वाघमोडे वस्ती वाशिंबे येथे गेली १४ वर्षे पाच महिने कार्यरत होते. त्यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित देखील करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला अस्थि विसर्जनासाठी देखील पैसे नाहीत. अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यामुळे दोन महिने थकीत रकमा, मेडिकल बिल, डीसीपीएस रक्कम, अनुकंपाखालील नियुक्ती करावी, चटोपाध्याय वेतनश्रेणी अशी मागणी सुप्रिया हरी काळे यांनी केली आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या रकमा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेसमोर त्यांच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांच्या पत्नी सुप्रिया हरी काळे यांनी दिला आहे.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने घर चालविले अवघड झाले आहे. घरातील सासरा, दीर यांचाही मृत्यू झाला असून, घरात कुणीच कर्ता माणूस नाही. त्यामुळे पतीची देयक रकमा मिळावी, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून जिल्हा परिषदेकडे त्या हेलपाटे मारत आहेत. मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रत्येकवेळी टाळाटाळ करीत असल्याची माहिती सुप्रिया काळे यांनी सांगितली.
● ११ महिन्यांपासून झेडपीकडे हेलपाटे
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पतीच्या देय रकमा मिळाव्यात, यासाठी चकरा मारीत आहे. परंतु शिक्षणाधिकारी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करत आहेत. गेल्या अकरा महिन्यांपासून आठवड्यातून दोनवेळा जिल्हा परिषदेत येत आहे. प्रत्येक वेळी विविध कारणांमुळे अधिकाऱ्यांची भेट होत नाही आणि झाली तर मॅडम तुमचे काम होईल जावा, असे सांगण्यात येत आहे.