सांगली : सांगलीतील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदी निवडून आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत हिराबाई कुंडलिक पडळकर या विजयी झाल्या आहेत. Gopichand Padalkar’s Matoshree was selected as Sarpanchpadi Sangli Atpadi
गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री हिराबाई तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत. पडळकरवाडीत त्यांची एकहाती सत्ता आली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजपचे स्टार प्रचारक असून त्यांनी निवडणुकीत जोर लावला होता. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतवर आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे.
ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्यांनी गुलाल उधळला आहे. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत.
गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना विराजमान झाल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ भाजप आमदार सुभाष देशमुखांना धक्का
– भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यात धक्का बसला. मंद्रूप ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा विजय.
#GramPanchayatElection #Grampanchayat #सोलापूर #solapur #सुराज्यडिजिटल #surajyadigital
– वेंगुर्ले तालुक्यातील चिपी ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.
#grampanchayatelection2022
□ इंदोरीकर महाराजांच्या सासू जिंकल्या
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंच झाल्या आहेत. त्यांनी संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. अपक्ष उमेदवार शशिकला शिवाजी पवार यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
□ शिवशक्ती व भीमशक्तीचा पहिला विजय
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या शिवशक्ती व भीमशक्तीने अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. नंदकिशोर गोरले विजयी झाले असून सर्वच्या सर्व सात सदस्य विजयी झाले आहेत. राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठाकरे व आंबेडकरांच्या आघाडीला मिळाली आहे.
□ काँग्रेसची 45 वर्षांची सत्ता गेली
#surajyadigital #grampanchayatelection2022 #सुराज्यडिजिटल
– यवतमाळ तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीत 45 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपचा विजय. 45 वर्षे काँग्रेसची सत्ता होती.
#यवतमाळ #yavatmal
– दापोली तालुक्यात आमदार योगेश कदम यांचे वर्चस्व, 14 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने मिळवला मोठा विजय. वेळवी आणि कळंबट ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेल्यात.
#GramPanchayatElection #Grampanchayat #कांग्रेसपार्टी #Congress
– यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील लींगी ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाच्या प्रियंका निलेश जाधव सरपंचपदी विजयी झाल्या.