□ सोलापुरात कार्यकर्ते – समर्थकांचा विजयी जल्लोष
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप माने गटाने तालुक्यावर वर्चस्व मिळवलं आहे. आम्हाला भाजपला रोखण्यात यश आले असून उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात जनतेने बदल घडवल्याची प्रतिक्रिया माजी आमदार दिलीप माने यांनी दिलीय. North Solapur: Dilip Mane group dominated in 8 out of 10 seats Gram Panchayat results
माने गटाने लढवलेल्या 10 ग्रामपंचायत पैकी 8 सरपंच पदावर विजय मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक ठिकाणी राष्ट्रवादी तर 3 ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.
□ माने गटाने जिंकलेल्या सरपंच पदासह ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे..
पाकणी – बालाजी येलगुंडे (सरपंच) 8 सदस्य
कवठे- मारुती इंजीनवाले (सरपंच) 6 सदस्य
अकोलेकाटी-अंजली क्षीरसागर (सरपंच) 7 सदस्य
कारंबा-तुकाराम चव्हाण (सरपंच) 9 सदस्य
नरोटेवाडी-उमेश भगत (सरपंच) 6 सदस्य
नंदूर-गंगुबाई व्हनमाने (सरपंच) 9 सदस्य
शिवणी-प्रियांका खळसोडे (सरपंच) 7 सदस्य
रानमसले-मनोहर क्षीरसागर (सरपंच) 4 सदस्य
माने गटाने मार्डी व कौठाळी या ग्रामपंचायत लढवल्या नाहीत त्याठिकाणी मार्डीमध्ये भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत प्रांजली पवार या विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे यांचा पराभव केला. गावडी दारफळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काका साठे यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला. तिथे भारत माळी हे सरपंच पदी विजयी झाले. कौठाळीत भाजपच्या श्वेता पाटील या सरपंच पदी विजयी झाल्या, डोणगाव मध्ये मात्र माने गटाचे सरपंच 17 मतांनी पराभूत झाले त्याठिकाणी राजश्री आमले विजयी झाल्या.
निवडणुकीचे निकाल हाती येताच विजयी उमेदवार समर्थकांनी सोलापूर शहरातील ब्रम्हदेवदादा माने बँकेसमोर हलगीच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करत एकच जल्लोष केला, सर्वांचा दिलीप माने व पृथ्वीराज माने यांनी सत्कार केला. पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले, आम्ही उत्तर व दक्षिण तालुक्यात भाजपला रोखण्यात यशस्वी झालो असून उत्तर तालुक्यात 10 पैकी 8 जागा माने गटाने राखल्याचा दावा त्यांनी केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》माढा । भोसरे ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर, आ. शिंदे बंधूंचे एकहाती वर्चस्व
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वात जास्त महसूल असणारी ग्रामपंचायत म्हणजे भोसरे ग्रामपंचायतचा निकाल हा अतिशय चुरशीचा लागला. मागील पाच वर्ष सत्तेवर असलेल्या युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
आमदार दादा मामा गटांच्या सर्व शिलेदारांनी एकत्र येत ग्रामविकास आघाडीची स्थापना केली. ग्रामविकास परिवर्तन आघाडी विरोधात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल व आरपीआयचे उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप एकत्र येत शिवशक्ती भीमशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. दादा मामा गटाच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीने सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून सौ स्वाती निळकंठ कुंभार यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेना व आरपीआय गटाने मिनाक्षी महेश पाटणे यांना उमेदवारी दिली.
सरपंच पदाच्या दुहेरी लढतील स्वाती निळकंठ कुंभार यांनी मीनाक्षी पाटणे यांचा 156 मतांनी पराभव केला. भोसरी ग्रामपंचायत जनतेतून सरपंच होण्याचा पहिला महिलांचा मान होण्याचा सन्मान त्यांनी मिळवला. भोसरे ग्रामपंचायतच्या 17 सदस्यांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 17 पैकी 9 जागावर दादा मामा गटाच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे वर्चस्व राहिले. तर शिवसेना आरपीआय गटाच्या 8 जागांना यश मिळवता आले.