वेळापूर : वेळापूर ग्रामपंचायतीवर उत्तमराव जानकरांची चौथ्यांदा सत्ता सरपंच निवडणुकीत रजनीश बनसोडे ५९५ मतांनी विजयी तर १७ पैकी ११ जागांवर उत्तमराव जानकर गटाने यश मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. Uttamrao Jankar’s fourth term in power over the Gramapur Gram Panchayat
वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या गटाने सरपंचपदाचे उमेदवार रजनिश बनसोडे यांनी ६९५ मतांनी विजय झाले तर १७ पैकी ११ जागा जिंकून उत्तमराव जानकर गटाने मोठे यश मिळवले आहे. वेळापूर येथील ग्रामपंचायतीसाठी सुमारे ७२.६० टक्के मतदान झाले होते. आणि सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली होती.
राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या विरुध्द मोहिते पाटील गट अशी दुरंगी लढत असली तरीही तिसऱ्या आघाडीनेही सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली होती. सरपंच व सदस्यांसाठी झालेल्या वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रजनीश बनसोडे हे ५९५ मते मिळवून तिरंगी लढतीमध्ये विजयी झाले आहेत. तर, मोहिते पाटील गटाकडून भारत बनसोडे हे दुसऱ्या क्रमांकावर तर काकासाहेब जाधव यांच्या तिसऱ्या आघाडीच्या माया उर्फ सदाशिव साठे १८६५ मते या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आहेत.
आज दुपारी १.०० च्या सुमारास पॅनल विजयाची उत्तमराव जानकर गटाला वार्ता समजताच उत्तमराव जानकर यांनी उपस्थित मुख्य कार्यकर्ते जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, रिपाई माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, माजी सरपंच सौ विमलताई जानकर, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, जीवन जानकर, संजय देशपांडे , मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब घाडगे, विनायक माने, जवान माने देशमुख, संदीप माने देशमुख, अमोल पनासे, सुखदेव आडत, जीवन वाघे, धनंजय शिवपुजे, चंद्रकांत पोळ, दीपक माने देशमुख, युवराज मंडले, शिवाजी मंडले, धनंजय शिवपुजे, यांच्यासमवेत जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत वेळापूर शहरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली.
वेळापूर ग्रामपंचायत निवडणूक ही गेली पंधरा वर्षे वेळापूर गावाच्या विकासाची कामे केल्यानेच जनतेने चौथेंदा पॅनल निवडून देऊन जनतेने विजयाची पोचपावती दिली असून माळशिरस तालुक्यात १५ ते १६ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या असल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले.
● जानकर गटाचे निवडून आलेले उमेदवार
वार्ड क्रमांक १ नानासो मुंगूसकर, तानाजी चव्हाण, वार्ड क्रमांक ३ प्रियंका शंकर आडत, अशोक मधुकर वायदंडे वार्ड क्रमांक ४ विमल जाधव, छाया साठे वार्ड क्रमांक ५ मध्ये स्नेहल जीवन जानकर, संजय पांडुरंग मंडले, सीमा रायचंद खाडे, वार्ड क्रमांक ६ सिमरन मुलाणी, रवी गायकवाड तर मोहिते पाटील गटामधून ६ उमेदवार विजयी झाले. यामध्ये वार्ड क्रमांक ३ नयन माने, वार्ड क्रमांक ४ शिवाजी पनासे, वार्ड क्रमांक २ मध्ये दीपक राऊत, अमृतराव माने देशमुख, प्रियंका चव्हाण हे विजय झाले तर उत्तमराव जानकर यांच्या पॅनल मधून सरपंच पदासाठी रजनीश बनसोडे यांनी ५९५ मतांनी विजयी मिळवला. तिसऱ्या आघाडीला चांगली प्रचार यंत्रणा राबवूनही त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही.