● दादा मामा गटाला 9 जागा व सरपंचपद तर शिवसेना – आरपीआय गटाला 8 जागा
● सरपंच पदाच्या स्वाती कुंभार विजयी
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वात जास्त महसूल असणारी ग्रामपंचायत म्हणजे भोसरे ग्रामपंचायतचा निकाल हा अतिशय चुरशीचा लागला. मागील पाच वर्ष सत्तेवर असलेल्या युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. Madha. After the transfer of power in Bhosre Gram Panchayat, MLA Shinde brothers single-handedly dominate Solapur
आमदार दादा मामा गटांच्या सर्व शिलेदारांनी एकत्र येत ग्रामविकास आघाडीची स्थापना केली. ग्रामविकास परिवर्तन आघाडी विरोधात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल व आरपीआयचे उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप एकत्र येत शिवशक्ती भीमशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. दादा मामा गटाच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीने सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून सौ स्वाती निळकंठ कुंभार यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेना व आरपीआय गटाने मिनाक्षी महेश पाटणे यांना उमेदवारी दिली.
सरपंच पदाच्या दुहेरी लढतील स्वाती निळकंठ कुंभार यांनी मीनाक्षी पाटणे यांचा 156 मतांनी पराभव केला. भोसरी ग्रामपंचायत जनतेतून सरपंच होण्याचा पहिला महिलांचा मान होण्याचा सन्मान त्यांनी मिळवला. भोसरे ग्रामपंचायतच्या 17 सदस्यांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 17 पैकी 9 जागावर दादा मामा गटाच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे वर्चस्व राहिले. तर शिवसेना आरपीआय गटाच्या 8 जागांना यश मिळवता आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश बागल यांनी स्वतःचा प्रभाग क्रमांक पाच बदलून दोन महिन्यात तयारी करित प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांच्या मातोश्री सुलन रामदास बागल यांना दादा मामा गटातून उमेदवारी दिली आणि तब्बल 355 मतांनी विजय प्राप्त केला. भोसरे च्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठा विजय समजला जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● सरपंच असलेल्या धनाजी बागल यांचा पराभव हा लक्षवेधी ठरला
भोसरी ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा जनतेतून निवडून आलेले सरपंच म्हणून धनाजी बागल यांनी मान मिळवला होता. यंदा झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये ते सदस्य पदाला उभा असताना रविराज सुरेश बागल या पंचवीस वर्षाच्या तरुणाने माजी सरपंच धनाजी बागल यांचा तब्बल 93 मतांनी पराभव केला. धनाजी बागल व रविराज बागल यांची ही लढत तालुक्यात लक्षवेधी लढत समजली जात होती.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये मार्केट कमिटीचे संचालक संदीप भोसले दहा मतांनी निसटता विजय प्राप्त केल्याने याची चर्चा तालुक्यात चांगली रंगली होती. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुधीर सर्जेराव बागल हा देखील लक्षवेधी विजय ठरला.
● भोसरे ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार
प्र. क्र. 1
मामा गट
*लता मधुकर बागल*
93 मतांनी विजयी
*शिवसेना*
*नितीन भारत काळे*-
40 मतांनी विजयी
*दिपाली परमेश्वर रिकीबे -*
38 मतांनी विजयी
प्र. क्र 2
*मामा गट*
*सौ सुलन रामदास बागल*
355 मतांनी विजयी
*सौ. बागवान मुनाबी याकुब*-
67 मतांनी विजयी
*शिवसेना व आरपीआय*
भोसले संदिप राजाराम
10 मतांनी विजयी
प्र.क्र. 3
-मामा गट
अक्षय रामचंद्र कांबळे
शिवसेना गट
चौधरी सुनंदा रामदास-
प्रभाग क्र. 4
*शिवसेना व आरपीआय गट*
अनसर राजू बादशहा पठाण –
168 मतांनी विजयी
सौरभ विष्णू गायकवाड –
100 मतांनी विजयी
*मामा गट*
पुनम अमोल खोत
59 मतांनी विजयी
प्र क्र. 5
*मामा गट*
रविराज सुरेश बागल
93 मतांनी विजयी
रिकीबे वैशाली आगतराव
48 मतांनी विजयी
माळी लंकाबाई श्रीकृष्ण
131 मतांनी विजयी
प्र.क्र 6
*मामा गट*
-सुधिर सर्जेराव बागल –
227 मतांनी विजयी
*शिवसेना*
औदुंबर बलभीम बागल –
52 मतांनी विजयी
शालन राजेंद्र बरबडे –
27 मतांनी विजयी
● ग्रामपंचायत निकालात मोठा उलटफेर
राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. एकूण 7 हजार 135 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत जवळपास 4 हजार ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. महाविकास आघाडीने जवळपास 1500 आणि भाजप- शिंदे गट यांनी 1500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.. तर इतर पक्षांनी 600 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवल्याचे सध्या चित्र आहे.