● अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप २६ पैकी १९ तर काँग्रेसचा २६ पैकी १५ विजयी झाल्याचा दावा
अक्कलकोट : सत्ताधारी भाजपाने अक्कलकोट तालुका मतदार संघातील २० ग्रामपंचायती व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीपैकी अशा २६ पैकी १९ ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आल्याचा दावा केला आहे तर काँग्रेसने अक्कलकोट तालुक्यातील अकरा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार असे २६ पैकी १५ ग्रामपंचायतीवर सत्ता आल्याचा दावा केला आहे. In Akkalkot taluka, Congress, BJP’s Jallosh Kalyanshetty Mhetre
अक्कलकोट तालुक्यातील सार्वत्रिक २० ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर होताच उमेदवारांनी जल्लोष केला. ग्रामपंचायतीसाठी रविवारी तालुक्यात ७९.३० टक्के चुरशीने मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता नवीन तहसिल कार्यालय येथे मतमोजणीस प्रारंभ झाला.
पहिल्या फेरीत तासाभरातच अशा अकरा ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. विजयी उमेदवार यांनी निकाल समजताच जल्लोष केला. पोलीसांनी मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बोरगांव देशमुख, पालापूर, घोळसगांव, सुलतानपूर, अरळी, बोरेगांव, दर्शनाळ, दहिटणेवाडी, शिरवळवाडी, सदलापूर, शिरवळ, कोन्हाळी, हालचिंचोळी, अंकलगे, खानापूर, रुद्देवाडी, आंदेवाडी ज, हत्तीकणबस, सलगर, नाविंदगी ૨૦ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक निकाल जाहीर झाला. नाविदंगी येथे फक्त सरपंच व एक सदस्यपदासाठी निवडणूक लागली होती. बाकीचे बिनविरोध झाले होते.
काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस च्या विचारांच्या उमेदवारांना निवडुन दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले व दावा केला. यावेळी युवा नेते प्रथमेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन पाटील, सातलिंग गुंडरगी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपाची सत्ता आल्याचा दावा करून विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी मिलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, शिवशरण जोजन आदींची उपस्थिती होती.
अक्कलकोट तालुक्यात २० पैकी १० महिला सरपंच निवडून आल्या. पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक पॅनल, गट, तट वर आधारीत निवडणुका झाल्या. यंदा पहिल्यांदाच ८० टक्के पेक्षा जास्त तरुण व सुशिक्षित उमेदवारांना मतदारांनी निवडुन दिले. पक्षापेक्षा स्थानिक गट तट व गावाचा विकास महत्वाचा असल्याने निवडुन आलेल्या उमेदवारांनी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षकार्यालयाला भेट देऊन सत्कार स्विकारले व गावच्या विकासाबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. देशमुख बोरगांव मध्ये काँग्रेस प्रणित सुरवसे व त्यांच्या पॅनेलचे दारुण पराभव झाला.
भाजपाने हा गड खेचुन आणला. पालापूर व बोरेगांव येथे भाजपाची सत्ता पालट झाली व काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला. रुध्देवाडी येथील माजी मंत्री यांचे कट्टर समर्थक अण्णाराव करवीर यांचा १५ वर्षानी सत्तापालट होऊन भाजपाने काँग्रेसच्या
बालेकिल्याला जोरदार खिंडार पाडले. कोन्हाळी येथे काँग्रेसचा बनसोडे पॅनेलचे दहा वर्षानी सत्तापालट होऊन उण्णद पॅनेलचा भाजपाने जोरदार मुसंडी मारली. तालुक्यातील मोठे ग्रामपंचायत व जि.प गट समजले जाणाऱ्या सलगर गावात काँग्रेसने गड राखला व आपली पकड कायम ठेवली. हत्तीकणबस येथे भाजपाची दहा वर्षाची सत्ता उलटुन काँग्रेसने बाजी मारली. शिरवळ येथे भाजपा तानवडे व बिराजदार पॅनलने पहिल्यांदाच एकत्र येत निवडणुका लढवुन सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
१) माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीपैकी अकरा गावावर काँग्रेस चे वर्चस्व असुन मतदार संघातील दक्षिण तालुक्यातील चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. पालापूर, नाविंदगी, बोरेगांव, आंदेवाडी ज, सलगर, शिरवळवाडी, दर्शनाळ, हत्तीकणबस, घोळसगांव, हालचिंचोळी, सदलापूर असे अकरा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व आहे व एक अपक्ष आलेला आहे. तर मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगांव, रामपूर, धोत्री, तोगराळी या चार गावांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे.
काँग्रेसला विचाराच्या पॅनलला आशीर्वाद दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो. या गावच्या विकासाची जबाबदारी आमची आहे. निवडुन आलेल्या काँग्रेसच्या सरपंचाना निधीचे आमीष दाखवून विरोधकांनी बोलावले तरी ते गेले नाहीत. उलट काँग्रेसने साठ वर्षात निधी दिला आहे व दीड वर्षानंतर आपलीच सत्ता येईल असा निर्धार बोलुन दाखविला त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. निधीच्या आमिषाला बळी पडले नाहीत. जिल्हा परिषदला मतदार यापेक्षा जास्त दणका देतील अशी अपेक्षा आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन व मतदारांचे आभार.
२) आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपाने अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील २६ पैकी १७ ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. याला सोडून दोन शिंदे गटाचे आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांने काँग्रेसला साफ नाकारले आहे.
३) संजय देशमुख – तालुकाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना- अक्कलकोट तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चे पालापुर, घोळसगाव, खानापूर तीन ग्रामपंचायतवर विजय झाला व २० ग्रामपंचायतीत पंधरा सदस्य निवडून आले.
४) भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अक्कलकोट तालुक्यातील २० पैकी १४ ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता मिळवली असुन २ शिंदे (बाळासाहेब शिवसेना) गटाचे आहेत. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्कलकोट मतदार संघातील सहा पैकी तीन भाजपाचे व दोन तटस्थ आहेत.