□ कुणी नवरी देता का नवरी
सोलापूर : लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. हा मोर्चा सोलापुरात निघाला. मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी विविध मागण्या करत शहरातील होम मैदानावर एकत्र येत, घोड्यावर बसून वरात काढली आहे. नवरदेवानी स्वतःहून ताशा वाजवला. Maharashtra State Jyoti Kranti Association Navardeva’s march on Collectorate in Solapur; Complaint of not getting a girl for marriage
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्हाला मुलगी द्या, समाजात मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा अशा विविध मागण्या करत माथ्यावर मांडावळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता शिक्षण झाले, शेती करतो, लग्नाचे वय झाले तरीही मुलगी मिळत नाही अशी खंत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढला. विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये या मोर्चात सहभाग नोंदवला आहे. संघटनेचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी या अनोख्या मोर्चाचे नेतृत्व केले.
घोड्यांवर वरात समोर बँड बाजा वाजवत काही नवरदेव बिना नवरीचे सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. हे लग्न नव्हतं तर हा मोर्चा होता. लग्नाला मुलगी मिळत नाही आता आम्ही काय करायचे? म्हणून वैतागलेल्या तरुणांनी नवरदेवाचा वेशभूषेत हा मोर्चा काढून लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायको मिळावी या एका प्रमुख मागणीसाठी हा आगळावेगळा मोर्चा सोलापुरात पाहायला मिळाला.
संघटनेचे नेते बारसकर यांनी या मोर्चा मागील आपली भूमिका स्पष्ट करताना, युवकांना लग्नाला मुलगी मिळत नसेल तर काय करावे, आई वडील वैतागले, अशांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांची मागणी सोडवावी अशी भूमिका त्यांनी मांडली.
सध्या मुलांची वेळवर लग्न होत नाहीत म्हणून त्या मुलाचे आई-वडील चितेंत आहेत. दुसरीकडे तरुणांनाही या प्रश्नाची चिंता आहे. लग्न न होणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. यामुळे समाजात अनुचित प्रकारामध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. यावर तातडीने मार्ग काढायला हवा आणि ती शासनाची जबाबदारी असल्याचे, या निवेदनात म्हटले आहे. या वेळी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भावी नवरदेवांनी वाजत गाजत वरात काढली. यावेळी मुंडावळ्या बांधून वर घोड्यावर बसून या आंदोलनात सहभागी झाले होते.