पुणे : पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (वय 57) यांचे आज निधन झाले आहे. त्यांना कर्करोग झाला होता. आज गुरुवारी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. MLA Mukta Tilak passes away, BJP’s first woman mayor of Pune
गेल्या काही वर्षांपासून त्या स्तनाच्या कर्करोगाशी पुण्यातील गॅलॅक्सी रुग्णालयात झुंज देत होत्या. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. तर चार वेळा नगरसेविका होत्या. उद्या शुक्रवारी सकाळी अंत्यदर्शनसाठी ९.०० ते ११.०० केसरी वाडा राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे ११.०० नंतर करण्यात येतील. नुकतच त्यांच्या मुलाचं लग्न झाल होत. मुक्ता टिळक 2017 ते 2019 या काळात पुण्याच्या महापौर होत्या. भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणूनही त्यांच्या नावाची नोंद आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या.
पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण झाले होते. तर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतलं. मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतल आहे. पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव – नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहें. होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या.
पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या.
● मुक्ता टिळक यांचा अल्प परिचय
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांच्या पणतू सून होत्या. शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या. मुक्ता टिळक यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये तर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवीच शिक्षण घेतलं. मानसशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. पुढे त्यांनी एमबीएचंही शिक्षण घेतलं.
सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या, महापौर या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच भाजपनं २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या.
पुण्यनगरीच्या कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आणि आमच्या सहकारी मुक्ताताई टिळक यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणाऱ्या मुक्ताताई यांनी पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणजेच ५६ व्या महापौर म्हणून कारभार सांभाळला होता. #BJP #Pune #MuktaTilak #RIP pic.twitter.com/hYQK8kKcZT
— Rajesh Pande (Modi Ka Parivar) (@PandeRajeshBJP) December 22, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा विविध चर्चांना उधाण आले आहे. यापुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे शिंदेंची खुर्ची धोक्यात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे ( मुख्यमंत्री) झाले पाहिजेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. एका जाहीर कार्यक्रमात बावनकुळे हे बोलले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षात असलल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी (फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे) हे उपस्थितांकडून बोलावून घेतले. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्याकरिता नाही, तर महाराष्ट्राचे भवितव्य हे देवेंद्र फक्त देवेंद्र फडणवीसचे घडवू शकतात, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे म्हटले. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदेंना सूचक इशारा दिला आहे. एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तूर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही, असे ते म्हणाले.