कुर्डुवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कुर्डूवाडी शहरातील गांधी चौकामध्ये रविवारी ( दि.२५ ) सायंकाळी ६ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. On whom will Tanaji Sawant fire Shiv Sena deputy leader Sushma Andhare’s cannon in Kurduwadi on Sunday?
सुषमा अंधारे सभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर तोफ धडाडणार का? याचबरोबर कोणाकोणाच्या विषयांवर बोलणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सभेमुळे शहरातील शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांना बळ मिळणार का? याची चर्चा होत आहे.
कुर्डूवाडी शहरातील नगरपरिषदेची सत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकत आहे. दर निवडणुकीमध्ये आघाडी, महाविकास आघाडी, भीमशक्ती शिवशक्ती अशा प्रकारे विविध आघाड्यां करून निवडणुकीचे समीकरण घालून कुर्डूवाडी नगरपालिकेवर सत्ता कायम ठेवत यश मिळवले आहे. तर या दरम्यान इतर कोणताही राजकीय पक्ष मोठा झाला नाही. तर सक्षम नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे.
माढा तालुक्यातील वाकाव गावचे सुपुत्र शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांचा कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अप्रत्यक्ष विरोध दर्शवला जात असे तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार निवडून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे व तानाजी सावंत मध्ये दुरावा निर्माण झाला होता. यानंतर मुख्यमंत्री शिंदे गट स्वतंत्र गट निर्माण झाल्यानंतर तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्री पद मिळाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेनेच्या उपनेते सुषमा आंधारे यांच्या राज्यभरात सभाचा धडाका सुरू असून मुख्यमंत्री शिंदे गट, भाजप व मनसेवर त्या जोरदार टीका करीत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या धडाकेबाज भाषणांमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे व त्यांना गावागावात ओळखू लागले आहेत. याच सुषमा अंधारे यांचा सोलापूर जिल्हा ही आयोजित करण्यात आला आहे.
कुर्डूवाडी शहरातील गांधी चौकात दि.२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सुषमा आंधारे यांची कोणावर तोफ डागणार व कोणाबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
□ आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पुणे : पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (वय 57) यांचे आज निधन झाले आहे. त्यांना कर्करोग झाला होता. आज गुरुवारी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही वर्षांपासून त्या स्तनाच्या कर्करोगाशी पुण्यातील गॅलॅक्सी रुग्णालयात झुंज देत होत्या. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. तर चार वेळा नगरसेविका होत्या. उद्या शुक्रवारी सकाळी अंत्यदर्शनसाठी ९.०० ते ११.०० केसरी वाडा राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे ११.०० नंतर करण्यात येतील. नुकतच त्यांच्या मुलाचं लग्न झाल होत.
मुक्ता टिळक 2017 ते 2019 या काळात पुण्याच्या महापौर होत्या. भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणूनही त्यांच्या नावाची नोंद आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या.