पंढरपूर : पंढरपूर तालुक्यांमध्ये बेकायदेशीर खडी क्रशरच्या माध्यमातून बेसुमार दगड उत्खननाचे काम खडी क्रशर मालकांनी केले होते. भुसुरुंग स्फोट घडवून दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असल्या प्रकरणी दादासाहेब चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी अप्पर तहसीलदार यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्व बेकायदेशीर खडी क्रशर सील बंद केले. Revenue administration re-sealed all illegal gravel crushers in Pandharpur taluka
गेल्या वर्षी सीलबंद केलेले खडी क्रशर पुन्हा सीलबंद केले आहेत. मधल्या काळात कोणाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर खडी क्रशर सुरू करण्यात आले होते? असा प्रश्न या निमित्ताने महसूल प्रशासनाच्या कार्यशैलीवर निर्माण होत आहे.
पंढरपूर तालुक्यात वाळू माफिया, सोबत दगड, मुरूम, माती माफियांनी तोंडवर काढले आहे. पंढरपूर तालुक्यातून बेसुमार दगड आणि मुरमाचा उत्खनन केली जाते. वारंवार तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत होते. पंढरपूर तालुक्यातील सुरू असलेले बेकायदेशीर खडी क्रशर बंद करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी दादासाहेब चव्हाण हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 26 डिसेंबर पासून आंदोलन करणार आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने पंढरपूर तालुक्यातील सर्व बेकायदेशीर खडी क्रशर सीलबंद केले आहेत. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अप्पर तहसीलदार समाधान घुटुकडे यांनी बेकायदेशीर खडी क्रशर मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानंतर बेकायदेशीर खडी कशाला मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र बेकायदेशीर खडी क्रशरची यादी प्रसिद्धीकरणासाठी महसूल प्रशासनाकडे मागितले असता यादी देण्यास नकार देण्यात आला. माहितीचा अधिकार वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
■ सील केलेले खडी कशाला महसूल प्रशासनाने केले पुन्हा सील
आंदोलनाच्या तोंडावर महसूल विभागाने पुन्हा खडी क्रशर सीलबंद केले आहेत. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये महसूल प्रशासनाने बेकायदेशीर खडी क्रशर सीलबंद केले होते. मात्र कोणाच्या आशीर्वादाने सीलबंद खडी क्रशर सुरू करण्यात आले? कोणाचे आर्थिक लागेबांधे आहेत. यामध्ये सामील अधिकाऱ्यांचे निलंबन होईपर्यंत पुणे विभागीय आयुक्त कार्यासमोर आंदोलन करणार आहे.
– दादासाहेब चव्हाण, आंदोलनकर्ते
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मंद्रूपचे रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे निधन
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश श्री ष.ब्र.रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी ( वय ६५ )यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान अश्विनी रुग्णालयात निधन झाले आहे.
श्री रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पूजेसाठी बसत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. यावेळी त्यांचे बंधू संगमनाथ हिरेमठ आणि इतरांनी त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात हलविले.
यावेळी उपचारादरम्यानच रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजी हे लिंगैक्य झाले. त्यांच्या लिंगैक्यामुळे वीरशैव लिंगायत समाजासह इतर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.