□ भाविकांनी मास्कचा वापर करावा – कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे
पंढरपूर : राज्यातील मंदिरात आजपासून मास्कसक्ती केलीय. त्या अनुषंगानेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. पण ही मास्कसक्ती फक्त कर्मचाऱ्यांना केलीय. Mandatory masks for officers and employees of Shree Vitthal Rukmini Pandharpur temple
आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंढरपुर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच राज्य सरकारने उपाययोजना सुरू केली आहेत. त्यातच गर्दीच्या ठिकाणी असणारे पंढरपूर येथे सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र कोरोनाची काळजी लक्षात घेता मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी चर्चा करून मंदिर परिसरात आणि मंदिरातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.
मात्र मास्क सक्ती भाविकांसाठी करण्यात आली नाही. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी आवाहन केलं आहे की, भाविकांनी मास्कचा वापर करावा. आपली आणि परिवार नातेवाईकांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी मास्क घालून यावा तसेच मंदिर समितीच्या वतीने मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांसाठी मोफत मास्क पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ राज्यातील मंदिरात आजपासून मास्कसक्ती
#maharashtra #महाराष्ट्र
》कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले आहे. अशातच आता राज्यातील प्रमुख मंदिरात आजपासून (23 डिसेंबर) मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला.
#shirdi #pune #kolhapurkar
#सुराज्यडिजिटल #मास्क #mask #coronavirus #surajyadigital #temple
– शिर्डीतील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करावा लागणार आहे.
– कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती.
• पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी – येताना भक्तांनी मास्क घालावा असे सांगण्यात आले.
□ लोणावळ्यात पर्यटकांसाठी मास्क सक्ती
देशात वाढत्या कोरोनामुळे लोणावळा नगरपालिकेकडून पर्यटकांना मास्क सक्ती करण्यात आहे आहे. त्यामुळे आता लोणावळ्यात जाताना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आली आहे. तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासन, शिर्डी साईबाबा ट्रस्ट व मुंबादेवी मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
● कोरोना – दगडूशेठ प्रशासन अलर्ट मोड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान अलर्ट मोडवर आले आहे. मंदिर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशांना मोफत मास्क वाटले जात आहे. तसेच मंदिरात मास्क वापरा अशा सूचना फलकावर लावल्या आहेत. मंदिर प्रशासन गणेशभक्तांसाठी 5 हजार मास्क खरेदी करणार आहे. तसेच भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.