□ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन : कारंजे
□ इमारतीवर कायमस्वरूपी तिरंगा विद्युत रोषणाई
सोलापूर : सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाचे काम या महिना अखेर पूर्ण होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. Indrabhuvan building renovation work will be completed by the end of the month Chief Minister Deputy Chief Minister inauguration planning
या इमारतीवर तिरंगा विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन आता सर्वांना घडणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. 110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या सुमारे 5 कोटीच्या निधीतून नुतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या दहा महिन्यापासून हे इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. सनरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनी मार्फत हे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कंजर्वेशन आर्किटेक्चर मुनिश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशे कारागीर यासाठी परिश्रम घेत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हे नूतनीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. येत्या महिना अखेरपर्यंत सर्वच काम पूर्ण होईल तशा सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गत सौंदर्य प्राप्त करून दिले असल्याची माहिती
अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी दिली. पूर्ण काम झाल्यानंतर साधारणतः 26 जानेवारी पर्यंत महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त यांची कार्यालय राहणार आहेत तर खाली कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे.
□ मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये आयुक्तांचे कार्यालय
मुंबईनंतर सोलापुरात हेरिटेज वास्तूमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय आहे. सोलापुरातील इंद्रभुवन ही वास्तू हेरिटेज वास्तू आहे. 110 वर्षांपूर्वी आकर्षक अशी ही इमारत उभारण्यात आली होती,असे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.
□ पुण्यश्लोक वारद यांचा पुतळा जैसे थे राहणार
इंद्रभुवनसमोर सध्या असलेला पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांचा पुतळा आहे. त्याच ठिकाणी जैसे थे राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.