□ सामूहिक बलात्कार प्रकरणात हायकोर्टाने दिला आदेश
■ तपास अधिकाऱ्याने केला होता आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न
सोलापूर : सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातून एका आरोपीचे नाव वगळून दुसऱ्या आरोपीविरोधातील कलमे कमी करून आरोपींना सहकार्य करणा-या तपास अधिकाऱ्याचाच तपास थेट आयपीएस अधिकान्यामार्फत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. गडकरी व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला. Solapur gang-rape case: Court order to investigate the investigating officer through the IPS officer
या आदेशामुळे येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक (तपास अधिकारी) विष्णू गायकवाड अडचणीत आले आहेत.
गणेश कैलास नरळे (वय २९ वर्षे धंदा – मजुरी रा. गणेश मंदिराजवळ, आवसे वस्ती, आमराई सोलापूर) आणि विष्णू गुलाब बरगंडे (वय ४० वर्ष धंदा – नोकरी रा. आवसे वरती लक्ष्मी पेठ, सोलापूर) या दोन आरोपीविरुध्द सोलापुरातील एका महिलेने पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर ही फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली होती. त्यावरून नरळे आणि बरगंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
याप्रकरणी पिडीत महिले उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणातील तपास अधिकारी बदलून अन्य अधिकाऱ्याची नेमणूक करुण निष्पक्षपणे फेरतपास करण्याची मागणी करणारी याचिका अँड. विक्रांत फताटे व अँड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत दाखल केली. या याचिकेची सुनावणी न्या. ए. एस. गडकरी व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर झाल्यानंतर व्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणात पिडितर्फे अँड. विक्रांत फताटे व अँड प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● तपास अधिकाऱ्याचा प्रताप
तपास अधिकारी विष्णू गायकवाड यांनी विरोधात सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करून आरोपी बरगंडे यास गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल न्यायालयात पाठवला होता. याशिवाय आरोपी नरळे याच्याविरोधातील सामूहिक बलात्काराचे कलम कमी करून फसवणुकीचे किरकोळ कलम लावून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले होते.
● वकिलांचा युक्तिवाद
अँड. विक्रांत फताटे यांनी पिडितेची बाजू मांडली. दोन्ही आरोपीविरुद्ध सामूहिक बलात्कार केल्याची फिर्याद दिली असून त्याप्रमाणे पिडितेने न्यायदंडाधिका-यांसमोर जबाब दिला आहे. मात्र तपास अधिकाऱ्याने आरोपींना मदत होईल असेच आरोपांच्या मित्रांचे जबाब नोंदवले. आरोपींना मदत होईल या अनुषंगाने पुरावे गोळा करून आरोपी बरगंडे यास गुन्ह्यातून वगळले तर नरळे याच्याविरूद किरकोळ कलम लावून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले, असा युक्तिवाद केला.
□ न्यायालयाचा आदेश
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करावा, सबंधित तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचे अधिकार कोणत्याही अधिनस्त अधिका-याला देऊ नयेत न्यायालयाच्या आदेशाची (प्रत) गृहमंत्री, कायदामंत्री आणि महिला आयोग यांना सादर करावी, पोलीस आयुक्त (सोलापूर) यांनी पिडितेला पुढील आदेश होईपर्यंत मोफत संरक्षण द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला.
● मूळ फिर्यादीत काय म्हटलंय
या प्रकरणातील फिर्यादी महिला आणि आरोपी सोलापुरात शेजारीशेजारी राहतात. आरोपी नरळेने फिर्यादीची मुले व पतीला ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीला मोटारसायकलवरून पुण्यातील उरळी देवाची येथे नेले होते. त्याठिकाणी खोली भाड्याने घेऊन ते राहिले. त्यानंतर सोलापुरात परत आली.
दरम्यानच्या काळात नरळे याने पुन्हा पहिल्याप्रमाणे धमकी दिली आणि पुण्यातील अपर इंदिरा महिला पुण्यात गेल्यानंतर नरदेअप्पर इंदिरानगर परिसरात खोली करून राहू लागले. आरोपी बरंगडे एके दिवशी त्याठिकाणी आला. त्यावेळी चिकन साठी म्हणून नरळे बाहेर गेल्यानंतर आरोपी बरगंडे याने फिर्यादीवर बलात्कार केला. जेव्हा नरळे परत आला तेव्हा बरंगडे बाहेर गैला. त्यावेळेस नरळेनेही फिर्यादीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
त्यानंतर फिर्यादी महिला ही तुंगत येथे नातेवाईकाकडे गेली. त्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसात दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. तीच फिर्याद पुढे सोलापुरात फौजदार चावडी पोलिसात वर्ग करण्यात आली.