सोलापूर /दीपक शेळके : श्री सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या विषयाने आता राजकीय वळण घेतले आहे. या कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी आणि आ. विजय (मालक) देशमुख यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. Solapur Dharmarajaj Kadadi blew up the ‘bar’, now Vijaykumar Deshmukh bang? Siddeshwar Factory
धर्मराज काडादींनी कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढून शहर उत्तरचे नेतृत्वबदलाचे आवाहन समाज बांधवाना करत देशमुख यांना ओपन चॅलेंज देत बार उडवला. देशमुख हे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात असल्याने सोलापुरात आल्यानंतर बोलू असे सांगितले आहे. त्यामुळे मालक आता कोणता धमाका करत काडादींना प्रतिउत्तर देतात याकडे सर्व राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा आणि सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी सोलापुरात चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडून चिमणी पाडण्यासाठी जोर लावला जात असतानाच दुसरीकडून चिमणी वाचवण्यासाठी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काडादी यांनी कारखाना बंद पाडण्याचा आणि सिध्देश्वर यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करणारे झारीतील शुक्राचार्य यांचे पत्ते ओपन करत चिमणीचे कारण पुढे करून कारखाना बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे आपल्या संयमाचा बांध सुटला आहे. इर्षेतून आणि व्यक्तीद्वेषातून काहीजण कारखाना बंद पाडण्यासाठी आग्रही आहेत. असे हिन दर्जाचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा आता दाखवावी लागेल हे कटकारस्थान करणारे आपल्याच समाजातील असल्याचे मोर्चाच्या सभेतील भाषणात सांगत काडादींनी देशमुख यांना टार्गेट केले आणि थेट नेतृत्व बदलण्याचे आवाहन समाज बांधवाना केले.
यातून वेगळीच चर्चा ‘तम तम मंदी’मध्ये सुरू झाली आहे. काडादी यांनी विजय मालकांना दिलेले ओपन चॅलेंज हे काडादी यांचे राजकाणात सक्रिय होण्याचे अप्रत्यक्ष संकेतच मानले जात आहे. आतापर्यंत आपल्याला अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिल्या मात्र आपला राजकारण हा पिंड नसल्याने त्यांनी त्याला नकार दिला मात्र विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मात्र संधी आली तर नकार देखील देणार नाही, असे ठोसपणे प्रसार माध्यमाशी बोलताना काडादींनी सांगितले.
आपला माणूस म्हणून सोलापूरकरांनी तीनवेळा विधानसभेवर निवडून देऊन आमदार केले. जेव्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याची वेळ आली; तेव्हा नेतृत्वाविषयी विचारणा करण्यात आली. समाजातील चांगली व्यक्ती म्हणून व त्यांचा समाजाला काही तरी उपयोग होईल; या हेतूने मंत्रिमंडळात समावेशासाठी शिफारस केली.
परंतु त्याच व्यक्तीने मंत्री झाल्यापासून त्रास देण्यास सुरुवात केल्याचा घाव काडादींनी घातला, तो मालकांच्या जिव्हारी लागला आहे. याबाबत मालकांना विचारणा केली असता यावर त्यांनी अद्याप मौन बाळगले आहे. हिवाळी अधिवेशनानंतर सोलापुरात बोलू असे त्यांनी सांगितले. त्यामुळे काडादींच्या आरोपाला मालक काय प्रतिउत्तर देऊन धमाका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांचा सामना करावा लागतो.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मालकांना पक्षांतर्गत प्रत्येक वेळी शहर उत्तरची भाकरी फिरवण्याची मागणी केली जाते. समाज बांधावातून उठावाचे वादळ उठते मात्र मालकांनी असले अनेक आव्हाने पेलून पुन्हा आमदारकी प्राप्त केली. आगामी काळात मालकांची कसोटी लागणार, यात शंका नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अजित पवार शिंदे गटात आले तर आनंद; दीपक केसरकरांची खुली ऑफर
□ अजित पवारांसारखे उमदे नेतृत्व आमच्यासोबत आल्यास आनंदच
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. ‘अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे असा उमदा नेता आमच्याबरोबर आला तर का आवडणार नाही,’ असे केसरकर म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीत अजित पवार यांची घुसमट होत आहे, हे सर्वांना माहिती आहे. उमदा नेते आमच्यासोबत आले आनंदच होईल. असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग येथे केले. अजित पवारांना शिंदे गटात येण्याची ऑफरच त्यांनी एकप्रकारे दिली. भाजप प्रवीण पोटे आमदार पवार यांनी एका कार्यक्रमात पवार यांनी सकाळच्याऐवजी दुपारी शपथविधी केला असता तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते असे विधान केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केसरकर यांनी आपले मत मांडले.
मंत्री केसरकर म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांची मैत्री असते. एकमेकांबद्दल आदर असतो. पवार आमच्या सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आहे. ते आणि आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत असतो. ते आमच्या सर्वांसोबत आले तर आनंदच होईल. याला राजकारण म्हणून पाहू नये.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी माफी मागत पाटील यांची चूक असल्याचे अधोरेखित केले होते. त्यांच्या भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांबाबत अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी परखड स्पष्टोक्ती दिली होती. त्यानंतर अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतीलही आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यातून भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी अजित पवारांबद्दल विधान केले त्यानंतर केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. ते मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे त्यांच्यासारखा नेता आमच्या गटात आला तर आम्हाला ते हवेच आहे. अजित पवार यांच्याबद्दल महाविकास आघाडीत नाराजी आहे. खुद्द शरद पवार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे.