नागपूर : नागपुरातील अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात ठराव मांडला आहे. हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. Assembly passes resolution against Karnataka; Eknath Shinde’s big announcement for border people कर्नाटकातील 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असे यात सांगण्यात आले. तसेच कर्नाटकच्या वर्तनाचा निषेध करण्यात आला आहे.
हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सीमाभागातील लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या. 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असल्यास सरकारी नोकरीची संधी देणार, असे शिंदेंनी सांगितले. तसेच सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा शिंदेंनी केली. बेळगाव निपाणीसह 865 गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. कर्नाटक सीमाप्रश्नावर ठरावाचं वाचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु आहे. यावेळी शिंदे यांनी खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच कर्नाटक सरकारच्या वर्तनाचा निषेध. महाराष्ट्रातली वाहनांवर हल्ले झाले. सीमेवरची ८६५ गावं महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यातील वाहनांवर हल्ले झाले. सीमावादावा चीथावणी देण्याच जाणीवपूर्वीक काम कर्नााटक सरकारने केलं. सीमाभागातील मराठी माणसांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली. कुटुंबाला दरमहा २० हजाराची मदत जाहिर केली. तसेच सांस्कृतीक शैक्षणिक मदत जाहिर करण्यात आली. यासोबत सीमावरती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखून ठेवणार, असे नमूद आहे.
□ बाळासाहेबांचा फोटो विधानभवनात लागणार
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विधानभवनात लावण्यात येणार आहे. विधानभवनाच्या मध्यभागी हे तैलचित्र लावण्यात येणार आहे. हे तैलचित्र लावण्यासंबंधी विधानसभेत सरकारकडून प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. हे तैलचित्र लावून शिंदे गटाने ठाकरे गटावर एकप्रकारे कुरघोडी केली आहे. याआधीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात हे काम केले नाही, असे शिंदे गटाने म्हटले आहे.