सोलापूर – रस्त्यावर पिकपचे पंक्चर काढताना सिमेंटची वाहतूक करणाऱ्या बल्करच्या धडकेने माथाडी कामगार ठार तर अन्य तिघेजण जखमी झाले. हा अपघात अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. अपघातानंतर बल्करच्या चालक वाहन सोडून प्रसार झाला. Solapur. Mathadi worker killed on the spot in collision with container, three injured Akkalkot Road
नागेश बाबूराव कोळी (वय ३२ रा.सागर चौक मार्केटयार्ड, सोलापूर) असे मयताचे नाव आहे. या संदर्भात लक्ष्मीकांत सूर्यकांत आहेरवाडी (रा.गौडगाव ता.अक्कलकोट) यांनी जेलरोड पोलिसात फिर्याद दाखल केली. ते मार्केट यार्ड कांदा ठेवून आपल्या पिकप मधून अक्कलकोट रोडच्या दिशेने निघाले होते. मंदिराजवळ पिकपचे टायर पंक्चर झाल्याने ते वाहन उभे करून पाहणी करत होते.तर नागेश कोळी आणि इतर बॅटरीच्या सहाय्याने वाहनास मार्ग दाखवत होते. त्यावेळी अक्कलकोट ते सोलापूरच्या दिशेने जाणारा एमएच१२- आरएन-०१३४ या क्रमांकाचा बल्कर पाठीमागून धडकल्याने नागेश कोळी हा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाला. तर शरणप्पा शिवशंकर म्हेत्रे (वय ६४) करेप्पा सदाशिव धनगर (वय ५०) आणि श्रीकांत सुरेश आहेरवाडी (वय १९ रा. गौडगाव) असे तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद जेल रोड पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार मस्के करीत आहेत .
सिद्धार्थ चौकाजवळ ब्लेडने मारहाण; तरुण जखमी
सिद्धार्थ चौकाजवळील पाणी टाकीजवळ पूर्वीच्या भांडणावरून ब्लेड आणि हाताने केलेल्या मारहाणीत युवराज गोपाल शिवसिंगवाले (वय ३० रा.बापूजीनगर कालभैरव मठाजवळ) हा तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात गंगाबाई (आई) यांनी दाखल केले. त्याला अंकुश शिवसिंगवाले आणि अन्य दोघांनी मारहाण केली. अशी नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे .
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ शिक्षिकेचा पगार काढण्यासाठी पाच लाखाच्या लाचेची मागणी; एकजण अटकेत तर एक फरार
सोलापूर : शहरातील एका आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी ५ लाखाची मागणी करणाऱ्या एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी (ता.26) दुपारी सात रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अटक केली आहे.
यामध्ये सहभागी असलेला दुसरा शिपाई मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. समाज कल्याण विभाग सोलापूर अंतर्गत जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळा येथे शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या किसन मारुती भोसले (वय-५२,रा. वैष्णवी हाईट्स, कर्वेनगर, पुणे) तसेच प्राथमिक आश्रम शाळा बसव नगर मंद्रूप दक्षिण सोलापूर येथे शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या अशोक गेमु जाधव (वय-५२,रा. शिमला नगर, विजापूर रोड) या दोन कर्मचाऱ्यांनी आश्रम शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या तक्रारदार यांच्या शिक्षक पत्नीचे थकीत वेतन अदा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. ही लाच वरिष्ठांच्या नावे विजापूर रोडवरील डॉ.स्वामी यांच्या दवाखान्याच्या समोरील बाजूस असलेल्या हॉटेल सिद्धेश्वर येथे ५ लाख रुपयाची बक्षिस स्वरूपात लाचेची मागणी केली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, तसेच पोलीस अंमलदार अतुल, घाडगे स्वप्निल संत्राके यांनी सापळा रचून अशोक गेमु जाधव यांना पकडले. यात किसन मारुती भोसले हा फरार होण्यात यशस्वी झाला. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक जाधव यास उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.