● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावी
सोलापूर : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, असे कधीही म्हटले नाही. पण, आमदार व्हायचे ठरवले आहे. त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक मी शहर उत्तर मतदारसंघामधून लढणार आहे. जो पक्ष आमदारकीचे तिकीट देईल; त्या पक्षात राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, अशी भूमिका माजी महापौर महेश कोठे यांनी जाहीर केली. The party that gives the ticket will go to them, but the city will fight North Solapur: Mahesh Kothe Sharad Pawar complaint
गेल्या दोन दिवसांपासून महेश कोठे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना कोठे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. कोठे म्हणाले की, माझी मागणी आमदारकीची आहे. पण, महेश कोठे आमदार कसे होणार नाहीत, यासाठी सगळ्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केले आहेत. पण यंदा आमदारकी घ्यायचीच, असे आम्ही ठरवले आहे.
आमदार काय काम करू शकतो, हे सोलापूरला दाखवायचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ध्येयापासून जराही विचलित होणार नाही. ते म्हणाले की, एका कार्यक्रमात मी सोलापूरच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्याशी बोललो होतो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महेश कोठे हे शिंदे गटात प्रवेश करत असतील तर निधी दिला जाईल, असे त्यांनी मला सूचित केले होते. मात्र, मी राष्ट्रवादी सोडली, असे कधीही म्हटलेले नाही. काही लोक माझ्याविरोधात कायम बोलत असतात. मात्र त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही. मला मुख्यमंत्री शिंदे यांनीही भेटायला बोलावले होते. पण, मी त्यांना सांगितले की, मी यापुढची निवडणूक शहर उत्तरमधून लढवणार आहे. त्यामुळे जी पार्टी मला शहर उत्तरमधून तिकीट देईल, त्या पार्टीत राहण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही महेश कोठे यांनी स्पष्ट केले.
● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावी
ज्यांना मी राष्ट्रवादीत नको आहे, त्यांनी माझी तक्रार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे करावी. पवार यांना वाटले की माझ्यापेक्षा ते सक्षम आहेत, तर ते त्यांच्याकडे नेतृत्व देतील. त्यामुळे हा विषय आपल्या अखत्यारीतील नसल्यामुळे त्यांनी आपली कुवत बघून वागावे. कोणाला नेतृत्व द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे पवार यांना माहिती आहे, त्यामुळे पवार यांनी पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सांगितले तरी ते मी करायला तयार आहे, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.