● अक्कलकोट दक्षिण व अक्कलकोट उत्तर पोलिसांची कामगिरी
अक्कलकोट : दक्षिण पोलीसांचे ताब्यातुन पळून गेलेला घरफोडीचे गुन्ह्यातील आरोपी देवराज पवार (रा. अक्कलकोट) यास दक्षिण व अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेचे संयुक्त पथकाने सापळा रचुन पुन्हा अटक केली. Solapur. Accused in house burglary who escaped from police arrested in Akkalkot
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गु.र.नं. ६२४ / २०२२ भा.द.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल
गुन्ह्यातील अटकेतील आरोपी देवराज दिलीप पवार (वय १९ वर्षे रा. वडार गल्ली) हा दिनांक २४ डिसेंबर रोजी १:३० वा चे सुमारास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेमध्ये तपास चालु असताना, पोलीस अंमलदाराचे हाताला हिसका देवुन पळून गेलेने त्याचे विरूध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
आरोपी देवराज पवार यास तात्काळ अटक करणे बाबत पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,
अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे व अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडील एकुण चार तपास पथके तयार केली. आरोपीचा शोध घेणे करीता तात्काळ पथक रवाना केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पथकांनी अक्कलकोट शहर, अक्कलकोट तालुका, तसेच दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, अंब्याड किणी, आळंद, मादन हिप्परगा, जि. गुलबर्गा या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. मंगळवारी (ता. २७) आरोपी देवराज पवार हा सरसंबा, (ता आळंद, जि गुलबर्गा) येथे लपून बसले बाबत गोपनिय बातमी मिळाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तात्काळ रवाना झाले असता त्यांनी आरोपी यास सरसंबा येथे सापळा रचुन अटक केली.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी, सपोनि बाबासाहेब काकडे, सपोनि महेश भावीकटटी, पोसई रेवणसिध्द काळे, पोसई सिद्राम धायगुडे, पोहेकॉ अजय भोसले, पोहेकॉ राजकुमार कोळी, पोहेकॉ मल्लीनाथ कलशेट्टी, पोना सुभाष दासरे, पोना नबिलाल मियाँवाले, पोना गणेश अंगुले, हवालदार सुरेश जाधव, पोना काशिनाथ सदाफुले, पोकॉ जगदीश राठोड, पोको प्रमोद शिंपाळे, पोकॉ. शिवलींग स्वामी, पोकॉ श्रीकांत जवळगे तसेच सायबर पोलीस ठाणे कडिल पो. कॉ. खंडु माळी यांनी कारवाई केलेली आहे.