पंढरपूर : सासू, पत्नी , दोन मेहुणी, मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून विशाल धोत्रे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सासू, दोन मेहुण्या यांना माझ्या मृत्यूस जबाबदार धरावे, असा व्हिडिओ तयार करून त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सासू, दोन मेव्हण्या तसेच त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. A bribe-taking State Excise jawan commits suicide after being fed up with the troubles of mother-in-law, wife, sister-in-law
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल धोत्रे याचे पंधरा वर्षांपूर्वी नरखेडच्या वैशाली देवकर हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये वाद-विवाद होत होते. विशाल धोत्रे याला आपली पत्नी वैशालीचे अमोल धोत्रे यांच्याशी भेटणे आणि बोलणे चालू असल्यामुळे त्यांच्या दोघात सातत्याने भांडणे होत होती.
भांडण करून माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी गेलेल्या विशालला सासू रेखा चांगदेव देवकर, पत्नी वैशाली विशाल धोत्रे, अमोल दादा धोत्रे, मेव्हणा नागेश चांगदेव देवकर, मेव्हणी रेणुका सर्जेराव विटकर, मेहुणी साधना धर्मेश धोत्रे यांच्या त्रासाला कंटाळून विशालने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद विशालची आई मंगल धोत्रे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
विशालने आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ बनवून सासरच्या लोकांना माझ्या मृत्यू जबाबदार धरावे, असा व्हिडिओ बनवला होता. यातील संशयित आरोपी रेणुका सर्जेराव विटकर, साधना धर्मेश धोत्रे आणि वैशाली विशाल धोत्रे या तिघींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ वीस हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्कचा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
सोलापूर : दारूबंदी अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिनासाठी आरोपीला मदत करतो म्हणून तीस हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती वीस हजार रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
मलंग गुलाब तांबोळी (वय-३३,पद जवान नेमणूक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क-भरारी पथक,महाराष्ट्र राज्य मुंबई, सध्या रा. प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक,सैफुल येथे घरी भाड्याने,मुळ रा.ब्लॉक नं.५८,अश्विनी कॉलनी, एसआरपीएफ ग्रुप १० जवळ, विजापूर रोड सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
यातील वर नमूद संशयित आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे विरुध्द राज्य उत्पादन शुल्क सोलापूर येथे दारुबंदी अधिनियम अन्वये दाखल असलेल्या गुह्यात तक्रारदार यांना जामीनाच्या अनुषंगाने केलेल्या सहका-याचा मोबदला म्हणुन तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती वीस हजार रुपये स्विकारण्यास संमती दिली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक,पोलीस अंमलदार पोना.प्रमोद पकाले,पोना.अतुल घाडगे, पोकॉ.उमेश पवार पोकॉ.स्वप्नील सत्रके व चालक उडाणशिव सर्व नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.