▪️ उजनी संघर्ष समिती भेटणार मुख्यमंत्र्यांना
मोहोळ : सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून लाकडी निंबोडी योजनेसाठी निधी मंजूर करून निविदा काढण्यात आल्याने उजनी संघर्ष समिती संतप्त झाली आहे. यामुळेच समितीने सोलापूर जिल्ह्यातील अकरा आमदार आणि 3 खासदारांना चक्क बांगड्या पाठवल्या. Bangdya Ujani Sangharsh Samiti Wooden Nimbodi Scheme sent to eleven MLAs and 3 MPs of Solapur district
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. मात्र बारामती आणि इंदापूर मतदार संघातील योजना पूर्ण करण्यासाठी दोन्ही सरकारचा अट्टहास सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा राष्ट्रवादीकडेच राहावा यासाठी तर सध्याच्या सरकारने हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात यावे यासाठी प्राण पणाला लावले आहे. त्यामुळेच सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून लाकडी निंबोडी योजनेसाठी निधी मंजूर करून निविदा काढण्यात आली. असे असताना जिल्ह्यातील सर्व ११ आमदार आणि ३ खासदार मुग गिळून गप्प आहेत त्यामुळे संतप्त उजनी संघर्ष बचाव समितीच्या वतीने जिल्ह्यातील या सर्व लोकप्रतिनिधींना बांगड्या पाठवण्यात आल्या.
यावेळी मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील म्हणाले की, दोन्ही सरकारकडून आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला खिळळ घालणारी ही बाब म्हणावी लागेल. यासाठी आम्ही षंढ म्हणून थंड न राहता प्रसंगी रक्त सांडण्याची आमची तयारी आहे. शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष मोबीना मुलाणी म्हणाल्या की, आम्ही जरी सत्तेत असलो तरी शांत बसणार नसून लवकरच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील, सचिव माऊली हळणवर, स्वाभिमानीचे सचिन पाटील, शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, शंकर भोसले, हनुमंत गिरी, रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील, अनिल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, बाळकृष्ण बोबडे, विश्रांती भूसणर, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोबिना मुलाणी, भाजपचे सुनील पाटील, महादेव वाघमोडे, भारत जाधव, चंद्रकांत निकम, दिलीप ननवरे, गणेश बिराजदार, किसनराव खोचरे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️ जिल्हा भाजपमय झाला आहे, याचा विचार व्हावा
– बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा मतदारसंघ वाचविण्यासाठी राष्ट्रवादीने उजनीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला. तर हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात यावे यासाठी भाजप सेना सरकारने लाकडी निंबोडी योजनेची निविदा काढली आहे. मात्र सध्या सोलापूर जिल्हा भाजपमध्ये झाला आहे. जिल्ह्यातील ८ आमदार व २ खासदार भाजपचे आहेत. हे जनमत भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा विचार व्हावा.
– माऊली हळणावर
सचिव, उजनी बचाव संघर्ष समिती
▪️ बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
– उजनी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविले असून बुधवारी सकाळी १० वाजता लाकडी निंबोडी योजने संदर्भात बैठक असल्याचे सांगण्यात आले.