● असेल हिंमत तर या लोकात ; कळेल किंमत
सोलापूर : ‘केवळ समाजाचे आणि भावनिक राजकारण करत दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा थेट मैदानातच या, तरच तुमची विश्वासार्हता आणि किंमत जनतेला कळेल’, असे प्रतिआव्हान आ. विजयकुमार देशमुख यांनी सिध्देश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांना देत ‘चिमणी बेकायदेशीरच आहे’ असे ठणकावून सांगितले. No relation to the temple, Chimney illegal : Aa. Vijay Kumar Deshmukh’s counter-challenge Siddeshwar Sugar Factory
गेल्या दोन – तीन महिन्यांपासून सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीवरून कारखाना व्यवस्थापन आणि सोलापूर विकास मंचमध्ये घमासान चालू आहे. असे असताना धर्मराज काडादी यांनी शेतकऱ्यांसमवेत काढलेल्या मोर्चामध्ये थेट आ. विजयकुमार देशमुख यांच्यावर अप्रत्यक्ष टिका करताना यामागे त्यांचाच हात असल्याचे सांगत उत्तरचे नेतृत्व बदलावे, असे आवाहन केले होते. त्यावेळी आ. विजयकुमार देशमुख नागपूर अधिवेशनात होते, त्यांनी सोलापुरात आल्यावर यावर उत्तर देऊ असे सांगितले होते. त्यामुळे आ. देशमुख काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर त्यांनी यावर काडादी यांना खुले आव्हान देत ‘तुम्ही मैदानातच या लोकांमध्ये आल्यावर तुम्हाला किंमत कळेल’, असे स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ठणकावून सांगितले.
आ. देशमुख म्हणाले, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी ही बेकायदेशीरच आहे. भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन आम्ही चिमणी पाडकामाला स्थगिती दिली होती.
मात्र त्यानंतर त्यांनी आवश्यक परवानग्या काढणे अपेक्षित असताना तसे न करता उलट त्यांनी भाजपच्या आमदार आणि खासदारांना टार्गेट केले, हा कुठला न्याय आहे ? असा सवाल त्यांनी केला. जेव्हा सिध्देश्वर कारखान्याची चिमणी बेकायदेशीरपणे बांधली, त्यावेळी भाजपची सत्ता नव्हती. कागदपत्रे बघितले तर ते सिद्ध होईल. चिमणी बांधताना त्यांनी महानगरपालिकेची, पर्यावरण खात्यांचीही परवानगी काढली नाही, हे चुकीचे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ देवस्थानचा आणि माझा संबंध नाही
सिद्धेश्वर देवस्थानचा मी पंच नाही. त्यामुळे ते याबद्दल का बोलले मला माहिती नाही. भावनिक विषय करून त्यांनी केलेल्या चुका दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचा त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. तुम्ही चूक केली असेल तर लोकांसमोर जाऊन कबूल करायला हवी, असेही आ. देशमुख म्हणाले.
● विनाकारण टार्गेट करू नये
मी अथवा भाजपचा कोणताही कार्यकर्ता ही चिमणी बेकायदेशीर आहे म्हणून कोर्टात गेलेला नाही. असे असताना विनाकारण भाजपच्या आमदारांना आणि खासदारांना टार्गेट करणे चुकीचे आहे. तुम्ही कोणत्याच बाबीची परवानगी घेतली नाही; यात आमची चूक नाही. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा समोर येऊन राजकारण करा, असेही आ. विजयकुमार देशमुख म्हणाले.
● कोणाच्या सांगण्यावरून मंत्रिपद मिळत नाही
भाजप कोणाचेही ऐकून कोणाला मंत्रिपद देत नाही. येथे कामावर मंत्रिपद मिळते. काडादी यांनी चुकीचे काहीतरी सांगून गैरसमज पसरवू नये. मी विकासकामे केली म्हणून जनतेमधून चारवेळा निवडून आलो आहे, जनतेचाही माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मला राज्यात मंत्रिपद मिळाले, असेही आ. विजयकुमार देशमुख म्हणाले.
● पवार, शिंदेंनी तुम्हाला का मदत केली नाही ?
राज्यात महाविकास आघाडीची अडीच वर्षे सत्ता असताना खा. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अथवा रोहित पवार या लोकांनी तुम्हाला का मदत केली नाही ? चिमणी कायदेशीर का केली नाही ? असा सवाल आ. देशमुख यांनी केला. बेकायदेशीर कामाला आमदार आणि खासदारांनी काय मदत करावी? याचे उत्तर काडादी यांनी द्यावे, असेही आ. देशमुख म्हणाले.