□ मालक शेतात बसला होता लपून
सोलापूर : बार्शी तालुक्यातील शिराळा येथे बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आलेल्या फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटाप्रकरणी युसूफ हाजी मणियार याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालक मणियार हा फरार होता. त्याचा साथीदार नाना पाटेकर हा अद्याप फरार असून, पोलीस पथके त्याच्या मागावर आहेत. Barshi firecracker factory blast case owner sent to police custody, accomplice Nana Patekar absconding Yusuf Maniyar
बार्शी तालुक्यातील शिराळा – पांगरीच्या रोडवर बेकायदेशीररीत्या इंडियन फायर वर्क्स हा बेकायदेशीररीत्या फटाक्याचा कारखाना सुरू होता. चालू नवीन वर्षाच्या आरंभीच भर दुपारी फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. या अग्नितांडवात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनेक कामगार जखमी आहेत.
हा बेकायदेशीर कारखाना युसूफ हाजी मणियार (रा. पांगरी, बार्शी) व नाना पाटेकर (रा. धाराशिव ) हे दोघेजण भागीदारीमध्ये चालवत होते. सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता हा फटाक्यांचा कारखाना सुरू होता. घटनेच्या दिवशी भरदुपारी कारखान्यात स्फोट झाल्याने तिघा मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला उपचारादरम्यान मृत्यू पावली. या घटनेने पोलीस व प्रशासनात खळबळ उडाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे सदरची घटना घडल्याचा आरोप केला आहे. या स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली होती. मंगळवारी (ता. 3) शिरोळे शिवारातील शेतात लपून बसलेला युसूफ हाजी मणियार याला पोलिसांनी अटक केली, तर त्याचा पार्टनर नाना पाटेकर हा अद्याप फरार आहे. या स्फोटाप्रकरणी ग्रामस्थ संतप्त असून, जबाबदार अधिकाऱयावरही कारवाईची मागणी करीत आहेत.
युसूफ मणियारला बार्शी येथील न्यायालयात उभे केले असता 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. घटना घडल्यापासून ग्रामीण पोलिसांनी दोघांच्या अटकेसाठी चार पथके पाठवली होती. एपीआय नागनाथ खुणे यांच्या पथकाला मंगळवारी दुपारी माहिती मिळाली होती. इंडियन फायर वर्क्स फॅक्टरीचा मालक युसूफ मणियार हा शिराळे गावातील एका ज्वारीच्या शेतात लपून बसला होता.
चार पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन युसूफ मणियार यास बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला बार्शी येथील न्यायालयात उभे केले असता 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल करत आहेत.
कारखाना मालक आणि साथिदारावर भा.द.वि.304 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यापासून दोन्ही संशयित आरोपी फरार झाले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास युसूफ मणियार यास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी दिली.