मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात मुंडे यांच्या छातीला किरकोळ जखम झाल्याचे वृत्त आहे. परळीत ही दुर्घटना घडल्याची माहिती झाली आहे. उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. Former minister Dhananjay Munde’s car accident; Shifted to Mumbai for treatment
धनंजय मुंडे यांच्या गाडीला काल मंगळवारी रात्री परळीत अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंडे यांच्या छातीला किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना आजच मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी ते परळीतून विशेष विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान काळजी करु नका, मी ठिक आहे, असे मुंडे यांनी ट्विट केले आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
धनंजय मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलविल्याची माहिती आहे. परळी शहरातील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून धनंजय मुंडे घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे. याची माहिती धनंजय मुंडे यांनीच सकाळी दिली होती.
https://www.facebook.com/100064008043649/posts/pfbid09mES4XwCqPWcs6ehZDrQgRbu7r6rPQizikUxSH7pMPR1EQ1hywUVWThBRPamnGBvl/?mibextid=Nif5oz
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काळजी करण्यासारखं काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर विधानसभेत बोलताना अजित पवारांनी रात्री १२ ते ३ प्रवास करु नका असा सल्ला सभागृहात सगळ्यांना दिला होता. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन सुनावलं होतं. त्याकडे मुंडेंनी दुर्लक्ष केलं आहे.
मागील महिन्यात भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या अपघाताबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रात्री-अपरात्रीचा प्रवास सर्वांनी टाळायला हवा, पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, त्यामुळं शक्यतो रात्रीचा प्रवास टाळायला हवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत.
https://www.facebook.com/100064008043649/posts/pfbid027gt8BCxWBMPTHhh4dN718KQfD3MqBKFK7vNeYjLcgg1AmSgDF9aEawNgMxefW87Jl/?mibextid=Nif5oz