मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत आघाडीसाठी चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे. Shivshakti, Bhimshakti will fight in Mumbai Municipal Elections Together Politics Babasaheb Ambedkar Thackeray Raut ‘शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर आघाडीत आल्यास राज्यात परिवर्तन दिसेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी बहुसंख्य दलित समाज आहे’, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत आम्ही आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटासोबत लढवणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात आमची शिवसेनेसोबत बोलणी झाली आहेत, असे सांगितले. याआधी आम्ही 83 जागा लढवण्याची तयारी केली होती. पण आता शिवसेना देईल तेवढ्या जागा आम्ही लढवणार आहोत, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
शिवशक्ती- भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन हे जर शिवसेनेसोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वंचितसोबत स्पष्ट युतीचे संकेत दिले आहेत. राऊत आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेल, पण विरोध आहे असं वाटत नाही.
महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना माननारी शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकवटली आहे. त्याला महाराष्ट्रात मुख्य राजकीय प्रवाहात विरोध आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन हे जर शिवसेनेसोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जोगेंद्र कवाडे आणि शिंदे गटाच्या युतीवर बोलण्यास मात्र राऊतांनी विरोध केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी केलेलं भाष्य सकारात्मक आहे. प्रकाश आंबेडकर अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारण काम करत आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी ही शिवसेनेची इच्छा होती. शिवशक्ती – भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद आहे. सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रात ज्याप्रकारचं सत्ताकारण सुरु आहे ते उलथवण्यासाठी या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी शिवसेना सदैव तयार आहे, असही राऊत म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुंबई मनपा निवडणुकीसाठी ८३ जागांसाठीची आमची मागणी होती. पण आता शिवसेना जेवढ्या जागा मुंबई महापालिकेसाठी सोडेल त्या मान्य असतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. शिवसेना आणि वंचितमध्ये बोलणी झाली आहे. सध्या तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ठाकरे शिवसेना आणि वंचितने एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. यापुढच्या निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. शिवसेनेचा असा प्रयत्न आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घ्यावे. वंचितचाही त्याला विरोध नाही.
मात्र, सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती कळली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला उघड विरोध आहे. तसेच काँग्रेसचाही आम्हाला छुपा विरोध असल्याचे आंबेडकर म्हणाले. याआधी मुंबई पालिकेसाठी ठाकरे शिवसेना आम्हाला जितक्या जागा सोडेल त्या आम्हाला मान्य असतील, असेही ते म्हणाले. शिवसेना आणि आमच्यात जागा वाटपाचे कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारवर नाही. त्यामुळे वंचित आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची युती मला स्थिर दिसत असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाव्या दाबतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठीदेखील फडणवीस प्रयत्न करतील, असा दावाही आंबेडकर यांनी केला.