सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघातात प्रवासी घेऊन जाणारी बस अचानक पलटी झाली. या अपघातावेळी बसचा वेग कमी होता. मात्र रस्त्यात आलेल्या ऊसाच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खालील बाजूला पलटी झाली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण 35 प्रवाशी जखमी झाले आहेत. Bus overturned in Solapur; Fortunately there were no casualties but 35 people were injured
बार्शी तालुक्यातील सुर्डी – मालवंडी गावाजवळ एस. टी. बस पालथी होवून झालेल्या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस कुर्डुवाडीहून वैरागकडे येत असताना आज गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला.
यात अनेक प्रवाशांना दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सुर्डी मालनंजी गावाजवळ असा बसला अपघात झाला. कुर्डुवाडी येथून वैरागच्या दिशेने ही बस निघाली होती. ऊसाच्या ट्रकच्या पुढे जाताना चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र लहान मुले आणि महिला किरकोळ जखमी झाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अपघात झाला त्या ठिकाणाचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. एस.टी. चालकानं ओव्हरटेक करताना खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं नियंत्रण सुटलं अशी प्राथमिक माहिती आहे.
बसमध्ये ३७ प्रवासी होते. गाडी पालथी झाल्यानं सर्वांना दुखापत झाली आहे. बस फारशी वेगात नसल्यानं मोठी हानी टळली असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. समोरुन येणारा ट्रक मध्यभागातून येत होता. तेव्हा एस. टी. चालकानं गाडी बाजूला घेत होता आणि गाडीवरील नियंत्रण सुटलं. बस पालथी होवून शेतातील २ विद्युत खांबावरही आदळली. जखमींमध्ये महिला, विद्यार्थी यांचा समावेश आहे.
》 बरगड्यांना फ्रॅक्चर अन् डोक्याला जखमा
परळीत कार अपघातात जखमी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कार्यालयाने माहिती दिली आहे. ‘मुंडे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे, मुंडे यांच्या छातीच्या बरगड्यांना मार लागला आहे, त्यामुळे 2 बरगड्या फ्रेंक्चर झाल्या आहेत, त्यांच्या डोक्यालाही जखमा झाल्या आहेत,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री परळीत अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंडे यांच्या छातीला किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना आजच मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी ते परळीतून विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. दरम्यान काळजी करु नका, मी ठिक आहे, असे मुंडे यांनी ट्विट केले आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.