¤ कायमस्वरूपी विद्युत रोषणाईने उजळणार इमारत
सोलापूर : महापालिका आवारातील सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ११० वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाचे काम किरकोळ कामे वगळता जवळपास पूर्ण झाले आहे. गतवैभव प्राप्त झालेल्या दिमाखदार इंद्रभुवन इमारत प्रजासत्ताक दिनापासून म्हणजे २६ जानेवारी नागरिकांना पाहण्यासाठी होणार खुली होणार आहे. The ‘Indrabhuvan Building’ in Solapur will be open for citizens to see from the Republic Day Water Supply Department Engineer
या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. ११० वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूचे जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या ५ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या दहा महिन्यापासून हे इमारत नूतनीकरणाचे काम संरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत सुरू आहे. कंजर्वेशन आर्किटेक्चर मुनिश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० कारागीर यासाठी परिश्रम घेत आहेत.
हे नूतनीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. बाहेरील बाहेरील पोर्च मधील किरकोळ कामे आता हाती घेण्यात आली असून इतर सर्व कामे पूर्ण झाले आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठीची अंतर्गत फर्निचर व इतर कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यानंतर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभुवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त यांची कार्यालय राहणार आहेत तर खाली कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे.
□ दुसऱ्या मजल्यावर आयुक्तांचे कार्यालय
या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्व इतिहास असलेले छायाचित्रही लावण्यात येणार आहेत तसेच पहिल्या मजलावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय असेल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गत सौंदर्य प्राप्त करून दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर महापालिका : पाणीपुरवठा विभागासाठी अभियंत्यांच्या भरतीचा प्रस्ताव
¤ अतिरिक्त आयुक्त कारंजे यांची माहिती
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अंतर्गत पाणीपुरवठा विभागात आवश्यक असलेल्या आणखी 26 अभियंता भरतीसाठी महापालिक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली.
सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी मुख्य स्त्रोत ते वितरण व इतर प्रणालीसाठी आणखी २६ अभियंत्यांची आवश्यकता आहे. पाणीपुरवठा हा अत्यावश्यक सेवा सेवेचा भाग आहे. यामुळे या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची नितांत गरज आहे. हा विभाग अखंड सातत्यपूर्ण कार्यरत असतो. सध्या या विभागात २२ अभियंता कार्यरत आहेत.
आणखी २६ अभियंत्यांची गरज आहे. या २६ अभियंत्यांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याचेही अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी यावेळी सांगितले. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा नेटका आणि नियोजनपूर्वक, सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
● आयुक्तांकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी गुरूवारी सोरेगाव व टाकळी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते. तेथील जलवाहिनी दुरुस्तीची कामे, आवश्यक असलेली कामे, कामे करावी लागतील याची सविस्तर माहिती आयुक्तांनी यावेळी घेतली.